घाटकोपर दुर्घटनेत १७ जणांचा बळी घेणाऱ्या आरोपीस सात महिन्यांनी अटक
Ghatkopar Hording Accident: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील व्यवसायिक अर्शद खान याला सात महिन्यांनंतर अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेने व्यापारी अर्शद खान सोमवारी अटक केली आहे.
Ghatkopar Hording Accident: मुंबईतील घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर सात महिन्यांपूर्वी महाकाय होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना यावर्षी मे महिन्यात घडली होती. या दुर्घटनेतील आरोपी सात महिन्यांपासून फरार होता. या आरोपीला बेड्या ठोकण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेने ३० डिसेंबर रोजी अरशद खान याला लखनऊ येथून अटक केली आहे.
सात महिन्यानंतर अटक
घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील व्यवसायिक अर्शद खान याला सात महिन्यांनंतर अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेने व्यापारी अर्शद खान सोमवारी अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अर्शद खान याला लखनऊमध्ये अटक करण्यात आली आहे. या होर्डिंग घटनेशी संबंधित आर्थिक व्यवहार उघड करण्यासाठी त्याची अटक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मुंबई पोलिसांनी अर्शद खान याचा सर्वत्र शोध घेतला होता. परंतु तो आतापर्यंत मिळाला नव्हता.
यापूर्वी या लोकांना झाली अटक
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात यापूर्वी इगो मीडिया कंपनीचे संचालक भावेश भिंडे, कंपनीच्या माजी संचालक जान्हवी मराठे , होर्डिंगच्या देखभालीची जबाबदारी सांभाळणारे सागर पाटील आणि स्ट्रक्चरल अभियंता मनोज संघू यांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती.
काय झाली होती दुर्घटना
मुंबईत १३ मे २०२४ रोजी घाटकोपरमध्ये दुर्घटना झाली होती. त्या दिवशी जोरदार वादळ आले होते. घाटकोपरमधील छेदा नगरातील पेट्रोप पंपावर असलेले मोठे होर्डिंग कोसळले होते. हे अवैध होर्डिंग १५ हजार वर्ग फूटापेक्षा मोठे होते. या होर्डिंगची नोंद लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये होती. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच ७० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. होर्डिंग खाली दाबले गेलेल्या लोकांना काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. त्याला रेस्क्यूला ६० तास लागले होते. एनडीआरएफच्या टीमने हे रेस्स्कू ऑपरेशन राबवले होते.