“देवेंद्र फडणवीस हेच आभासी”, मुंबईच्या कोरोनास्थितीवर टीका केल्यामुळे शिवसेनेचा पलटवार
देवेंद्र फडणवीस हेच आता आभासी झाले आहेत, अशी खोचक टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली. (arvind sawant devendra fadnavis corona)
मुंबई : “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये कोरोनासंदर्भात आभासी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप केला आहे. पण आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलंय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच आता आभासी झाले आहेत,” अशी खोचक टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनEच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांची 9 मे रोजी बैठक घेतली. याविषयी बोलताना सावंत यांनी वरील वक्तव्य केले. (Arvind Sawant criticized Devendra Fadnavis over Mumbai Corona pandemic)
देवेंद्र पडणवीस हे आभासी
यावेळी बोलताना अरविंद सावंत यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये कोरोनाच्या स्थितीसंदर्भात आभासी चित्र रंगवले जात आहे, अशी टीका केलीय. पण आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. तसेच दुसरकीकडे देशातील सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा राज्याची आणि मुंबईच्या कामाची दखल घेतलीय. देवेंद्र फडणवीस हेच आता आभासी झाले आहेत,” असे अरविंद सावंत म्हणाले.
खबरदारी घेण्याचा टास्क फोर्सच्या डॉक्टरांचा सल्ला
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, आता तिसरी लाटसुद्धा येणार असल्याचे भाकीत केले जातेय. त्यामुळे राज्यात आणखी काळजी घेणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक घेतली. याविषयी अरविंद सावंत यांनी सविस्तर माहिती दिली. याविषयी बोलताना “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटात जनतेला कसा मदत करावी याबद्दल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसेनेच्या खासदारांना मार्गदर्शन केलं. तिसरी लाट येत आहे. यामध्ये लहान मुलंसुद्धा करोनाच्या संकटात बाधित होऊ शकतात. त्यामुळे आगामी काळात योग्य ती काळजी आणि खबरदारी आवश्य करा, असा सल्ला मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी दिलाय,” असे सावंत म्हणाले.
फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई येथील कोरोनास्थितीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्यांनी “मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, असे घडत आहे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होतेय. हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी फडणवीस यांनी आपल्या पत्रात केलीये.
इतर बातम्या :
मोदी सरकारची नाचक्की, कोरोना नियंत्रणावरुन जगप्रसिद्ध संशोधन पत्रिकेनंही पिसं काढली
(Arvind Sawant criticized Devendra Fadnavis over Mumbai Corona pandemic)