एक मिंधा दुसऱ्या मिंध्याला मिळाला…, अरविंद सावंतांचा रोख कुणाकडं?
मिंध्ये म्हटलं की, मिंध्ये. एक मिंधा दुसऱ्या मिंध्याला मिळाला तर काय फरक पडतो.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, 1966 चा मी शिवसैनिक आहे. 1968 ला मी गटप्रमुख होतो. चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक लढविली तेव्हा मी त्यांच्या प्रचारात अग्रणी होतो. 1988 ची निवडणूक तिथपासूनची एक छोटीशी कल्पना दिली. मी आमदार झालो नव्हतो. ते नगरसेवक झाले. आमदार झाले. मंत्री झाले. वाईट एकाचं गोष्टीच वाटते. चार-चार वेळा आमदार पद मिळालं. दोन वेळा खासदार पदं मिळालं. राज्यमंत्री झाला होतात. सगळं कसं एका क्षणात विसरता.
ज्युनिअर-सिनीअर वाद काय काढलाय. नारायण राणे मुख्यमंत्री झाले. तेव्हा गजानन किर्तीकर हे उपनेते होते. त्यामुळं ज्युनिअर-सिनीअर असा वाद कधीचं नव्हता शिवसेनेमध्ये. शिवसेनाप्रमुखांचा आदेश हा महत्त्वाचा असतो.
मिंध्ये म्हटलं की, मिंध्ये. एक मिंधा दुसऱ्या मिंध्याला मिळाला तर काय फरक पडतो. मिंध्ये आहेतच ना शेवटी. त्यांना विचारायचं मिंध्ये का झालात म्हणून. काय तुम्हाला मिळणार आहे. सूर्य पश्चिमेला मावळत असताना कळायला पाहिजे. मावळताना तरी निदान स्वाभिमानानं जावं. जाताना भगवा घेऊनचं जावं असं मलातरी वाटतं, असा टोला त्यांनी गजानन किर्तीकर यांना लगावला.
त्यांचा सूर काल लागला नाही. काही ठिकाणी मतदारसंघात जाताना तो सूर होता. का उद्धवजींनी केलं ते सांगितलं पाहिजे. लाचारी करायला उद्धवजी यांना आवडतं नाही. विधानसभेत युती का तोडली. एकट्या उद्धव ठाकरे यांनी 63 आमदार निवडून आणले होते. तेव्हा मिंध्ये विरोधी पक्षनेते होते. नैसर्गिक मित्र आहे. नैसर्गिक मित्र आहे. मांडीला मांडी लावून बसणार नाही, हे त्यांचंच वाक्य आहे ना, असा सवालही अरविंद सावंत यांनी विचारला.