आर्यनच्या सुटकेचा सस्पेन्स आणि हाय व्होल्टेज ड्रामा; दिवसभरात नेमकं काय घडलं?

आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी काल जामीन मिळाला. पण कोर्टाची ऑर्डर मिळाली नाही. त्यामुळे त्याची कालची रात्र तुरुंगात गेली. आज तो कोणत्याही परिस्थितीत तुरुंगाबाहेर येईल असं सांगितलं जात होतं. (Aryan Khan bail : Aryan Khan to spend one more night in jail, to be released tomorrow)

आर्यनच्या सुटकेचा सस्पेन्स आणि हाय व्होल्टेज ड्रामा; दिवसभरात नेमकं काय घडलं?
Aryan khan
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 6:53 PM

मुंबई: आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी काल जामीन मिळाला. पण कोर्टाची ऑर्डर मिळाली नाही. त्यामुळे त्याची कालची रात्र तुरुंगात गेली. आज तो कोणत्याही परिस्थितीत तुरुंगाबाहेर येईल असं सांगितलं जात होतं. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करण्यात वेळ गेल्याने आर्यन खान तुरुंगाबाहेर येऊ शकला नाही. त्यामुळे त्याची आजची रात्र मन्नत ऐवजी तुरुंगातच जाणार आहे. आर्यनच्या सुटकेसाठी आज दिवसभर आर्यनचे वकील आणि किंग खान शाहरुख खानची धावपळ सुरू होती. पण आजही त्यांच्या पदरी निराशा आली. नेमकं आजच्या दिवसात काय घडलं? त्याचा घेतलेला आढावा.

आर्यन खानच्या जामिनाची ऑर्डर कॉपी एनडीपीएस कोर्टातून आर्थर रोड तुरुंगात साडेपाच पर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे त्याला जामीन मिळूनही आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. आता लिगल टीम आज संध्याकाळी ऑर्डर कॉपी तुरुंग प्रशासनाकडे सादर करणार आहे. त्यानंतर उद्या शनिवारी त्याची सकाळी 11 वाजता सुटका होईल.

तुरुंग प्रशासनाचा नियम काय?

जामिनाची ऑर्डर कॉपी 5.35 ते 5.40 वाजेपर्यंत पोहोचली तरच कैद्याची सुटका होते. मात्र, आर्यनची ऑर्डर कॉपी 5.40पर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅफिकमुळे उशीर झाल्याने तुरुंगात ऑर्डरची कॉपी पोहोचू शकली नाही.

एक लाखाचा पर्सनल बाँड

आर्यनच्या जामिनासाठी एक लाख रुपयांच्या पर्सनल बाँडची रजिस्ट्री करण्यात आली. शाहरुख खानने पर्सनल बाँडची रक्कम जमा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कोर्टाने डिटेल ऑर्डर मागितली

एनडीपीएस कोर्टाने आर्यनच्या वकिलांना डिटेल ऑर्डर मागितली. त्यावर आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आमच्याकडे ऑपरेटिव्ह ऑर्डर असल्याचं सांगितलं. माझ्याकडे पेपर्स कंप्लीट आहेत. जामीनदार म्हणून जुही चावला आहे.

कोर्टात काय संवाद झाला?

मानेशिंदे: जुहीचा आधार आणि पासपोर्ट सोबत आहे. जुही: जुही चावला मेहता न्यायाधीश: कुणासाठी? जुही: आर्यन खानसाठी. मानेशिंदे: सर, जुही आर्यनला लहानपणापासून ओळखते. तसेच ती त्यांच्याशी प्रोफेशनलीही कनेक्टेड आहे. जज: अॅक्सेप्टेड मानेशिंदे: धन्यवाद

जुही बनली जामीनदार

आर्यनला जामीन मिळाला आहे. त्याला उद्या तुरुंगातून सोडण्यात येईल. आज कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. आर्यनसाठी अभिनेत्री जुही चावला जामीनदार बनली आहे.

संबंधित बातम्या:

जुही चावला सही करण्यासाठी कोर्टात पोहोचली, आर्यन खानची पुढच्या दोन तासात जेलमधून सुटका होण्याची शक्यता

Puneet Rajkumar Passes Away : कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, बंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास

VIDEO: पोर्न रॅकेटशी काहीच घेणंदेणं नाही, काशिफ खानचं नवाब मलिक यांना प्रत्युत्तर

(Aryan Khan bail : Aryan Khan to spend one more night in jail, to be released tomorrow)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.