‘मी मास्टरमाईंड नाही, समीर वानखेडेंशीही संपर्क नाही’, सुनील पाटील यांचं माध्यमांसमोर स्पष्टीकरण
आता सुनील पाटील यांनी स्वत: माध्यमांसमोर येत या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील हा मास्टर माईंड असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, मी या प्रकरणाचा मास्टरमाईंड नाही. समीर वानखेडे यांच्याशी माझा कधीही संपर्क झाला नाही, असं स्पष्टीकरण सुनील पाटील यांनी एएनआयशी बोलताना दिलंय.
मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील हे एक नाव समोर आलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनी सुनील पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता सुनील पाटील यांनी स्वत: माध्यमांसमोर येत या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील हा मास्टर माईंड असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, मी या प्रकरणाचा मास्टरमाईंड नाही. समीर वानखेडे यांच्याशी माझा कधीही संपर्क झाला नाही, असं स्पष्टीकरण सुनील पाटील यांनी एएनआयशी बोलताना दिलंय. (Sunil Patil’s explanation that he has no contact with Sameer Wankhede)
त्याचबरोबर ‘गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मी मुंबईत आलो होतो. तेव्हा मला राहायला घर नव्हतं. त्यामुळे चार सहा महिने मी ललित हॉटेलमध्ये थांबलो होतो. ललितमध्ये काहीच नव्हतं. राष्ट्रवादीचे नेते तिथे येत होते. शराब, कबाब असं सांगितलं जात आहे. मोहित कंबोजला सांगा मी दारू पीतच नाही. मी तिथे राहत होतो. पण पार्टीत नसायचो. सीसीटीव्ही फुटेज पाहा. त्यात कळेलच’, असं सुनील पाटील यांनी म्हटलंय.
मोहित कंबोज यांना आव्हान
‘आधी त्यांनी ऋषिकेश देशमुख यांचं नाव घेतलं. मी ऋषी देशमुखला ओळखत नाही. त्यांनी वळसे पाटीलचं नाव घेतलं. बनाव रेकॉर्डिंग दाखवली. त्याचाही तपास झाला पाहिजे. वळसे पाटलांना मी कधीच भेटलो नाही. अनिल देशमुख कोरोना काळात एकदा धुळ्यात आले होते. तेव्हा त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्याशी कधी भेट झाली नाही’, असंही पाटील यांनी म्हटलंय. ‘मी जर बदल्यांचं रॅकेट चालवत आहे तर माझ्याकडे किमान 100 कोटी तरी असावेत ना. मी मोहित कंबोजला चॅलेंज करतो की धुळ्यात जाऊन माझ्या प्रॉपर्टीचा तपास कर आणि नंतर रॅकेटची वार्ता कर’, असं आव्हान सुनील पाटील यांनी मोहित कंबोज यांना दिलं आहे.
मला फसवलं गेलं- सुनील पाटील
या प्रकरणात आपल्याला फसवलं गेल्याचा आरोपही सुनील पाटील यांनी केलाय. ‘मी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं सांगतात. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी कधीच सह्याद्रीला गेलो नाही. तेही काढा. सीसीटीव्ही फुटेज काढा सह्याद्रीचे. मी नवाब मलिक यांना कधीच भेटलो नाही. या प्रकरणावर 10 तारखेला माझं नवाब मलिकांशी बोलणं झालं होतं. मी त्यांना सांगितलं, मला भीती वाटते की, माझ्यावर सर्व टाकून मला हे लोक मारून टाकतील. तेच झालं’, असं ते म्हणाले.
Sunil Patil & Nawab Malik are friends for the last 20 yrs. When Sunil Patil used to do parties in Lalit hotel, Nawab also used to go there. Today Nawab Malik has confirmed his relations with him and it’s a conspiracy set up by NCP along with Sunil Patil: Mohit Kamboj in Mumbai pic.twitter.com/cRkS4lMYGE
— ANI (@ANI) November 7, 2021
‘दिल्लीत मनीष भानुशालीकडून मारहाण’
इतकंच नाही तर, ‘मी अहमदाबादमध्ये नोवाटल, हिल्टॉन हॉटेलमध्ये होतो. अहमदाबादेत मी थांबलो होतो. त्यांनी पाच सहा दिवसांपूर्वी मनिष भानुशाली आणि धवल भानुशालीने मला दिल्लीला बोलावलं होतं. मी भाड्याची कार घेऊन दिल्लीला गेलो होतो. पहिल्या दिवशी मला धमकी दिली. मारहाण केली. इथून गेला तर मारून टाकू, आम्ही मोठ्या नेत्यांना भेटणार आहोत. तू एक्सपोज कर. मी म्हणालो, काय एक्सपोज करू? जे सत्य आहे ते सांगा ना. मी कशाला कुणाला एक्सपोज करू’, असं पाटील म्हणाले.
इतर बातम्या :
‘शबाब, शराब, कबाब आणि नवाब’वरून नवाब मलिक आणि मोहित कंबोज यांच्यात जुंपली, वाचा दावे-प्रतिदावे
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात 11 पैकी 6 जणांचा गुदमरुन मृत्यू, तर चौघे होरपळले; शवविच्छेदन अहवाल पूर्ण
Sunil Patil’s explanation that he has no contact with Sameer Wankhede