रियाझ भाटीचं सचिन वाझे प्रकरणात नाव, राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याला लपवलंय का? आशिष शेलार यांचा सवाल
सचिन वाझेच्या चौकशीत रियाझ भाटीचं नाव आल्यानं त्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं लपवला आहे का? असा सवाल आशिष शेलार यानी केला.
मुंबई: नवाब मलिक सकाळी लवंगी देखील लावू शकले नाहीत. लवंगी लावण्याच्या प्रयत्नात त्यांचे हात पोळले. नवाब मलिक यांची हतबलता इतकी होती त्यांना हायड्रोजन सोडा ऑक्सिजन लागेल, असं आशिष शेलार म्हणाले. मुन्ना यादव, हाजी हैदार, हाजी अराफतचा भाऊ यासह नाव सांगून नवाब मलिक यांनी प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. याचा संबंध देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडणं म्हणजे अकबर आणि बिरबलाच्या गोष्टीशी आहे, असं आशिष शेलार म्हणाले. सचिन वाझेच्या चौकशीत रियाझ भाटीचं नाव आल्यानं त्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं लपवला आहे का? असा सवाल आशिष शेलार यानी केला.
मुन्ना यादव, हाजी अराफत आणि हाजी हैदर आमचेच कार्यकर्ते
संपूर्ण राज्य सरकारची यंत्रणा, तीन पक्ष एकत्र लावून सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप लावू शकले नाहीत. मुन्ना यादव, हाजी अराफत आणि हाजी हैदर भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांना विविध बोर्डावर बसवलं होतं. हाजी अराफत आणि हाजी हैदर यांच्यावर गुन्हा नसल्याचं स्पष्ट झाल्यावर अध्यक्षपद देण्यात आलं आहे.मुन्ना यादव यांच्यावर एक गुन्हा आहे त्याबद्दल ते सांगतील, असं आशिष शेलार म्हणाले.
नवाब मलिकांकडून सामान्य माणसाला लटकवण्याचा प्रयत्न
दोन वर्ष तुमच्याकडे सरकार आहे, तुमच्या पक्षाकडं गृहमंत्रिपद आहे. हाजी अराफत किंवा हाजी हैदर यांच्यावर एनसीसुद्धा नोंद करु शकला नाहीत. गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा आहे, असं आशिष शेलार म्हणाले. नवाब मलिक यांच्या आरोपाप्रमाणं बनावट नोटा प्रकरणातील आलम शेख हा काँग्रेसचा सचिव होता. तो सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. हाजी हैदर स्वत: पत्रकार परिषद घेणार आहेत. गेल्या दोन वर्षात बांगलादेश सोडा मंबईत कुठंही गुन्हा केल्याचं प्रकरण नाही. सामान्य माणसाला लटकवण्याचा प्रयत्न नवाब मलिक यांनी केला.
रियाझ भाटीला कुणी लपवलं?
पंतप्रधान कार्यालय किंवा पंतप्रधान कार्यक्रम यांच्याशी रियाझ भाटी संबंध आणि कार्यक्रम नाही. फोटोवरुन संबंध प्रस्थापित करायचे असतील तर मी रियाझ काझीचे फोटो दाखवतो म्हणत रियाझ भाटीचे शरद पवार,उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्यासोबतचे फोटो आशिष शेलार यांनी दाखवले. रियाझ भाटीशी देवेंद्र फडणवीसचा संबंध असण्याचं कारण नाही. क्रिकेटच्या राजकारणात रियाझ भाटीला कुणी स्थान दिलं यासंदर्भात मोठ्या नेत्याचं नाव घेणार नाही. रियाझ भाटीला सुरक्षित स्थळी पळवून ठेवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसनं तर केलं नाहीना, असा सवाल आशिष शेलार यांनी केला. सचिन वाझेच्या चौकशीत रियाझ भाटीचं नाव आल्यानं त्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं लपवला आहे का? असा सवाल आशिष शेलार यानी केला.
नवाब मलिक यांनी स्वत: ला मानिसकदृष्ट्या शांत करा. जावयासाठी राजकारणाच्या नीच पातळीवर जाऊ नका. नवाबी पातळीवर राजकारण नेऊ नका, असं आशिष शेलार म्हणाले. राज्यातील अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्ते, नेतृत्व नेस्तनाभूत करण्याच काम तुम्ही करताय का असा सवाल आशिष शेलार यांनी केला. शाहरुख खान, आर्यन खान, अस्लम शेख यांचं नाव यात आणण्याचा प्रयत्न नवाब मलिक करत आहेत. नवाब मलिक हाजी अराफत आणि हाजी हैदर यांना बदनाम करण्याचं काम नवाब मलिक करत आहेत. हा शुद्ध कट आहे, नवाब मलिक यांनी त्याचं उत्तर द्यावं, असं आशिष शेलार म्हणाले.
इतर बातम्या:
वेळ आली तर तुमची काळी संपत्ती आज ना उद्या काढणार, नवाब मलिक यांचा अमृता फडणवीसांना इशारा
नितेश राणेंकडून रियाझ भाटीचे उद्धव ठाकरे, शरद पवारांसोबतचे फोटो प्रसिद्ध, नवाब मलिकांना सवाल