संपवून टाकू, निपटून टाकू, बोलण्याची हिंमत जरांगेंमध्ये कशी आली…आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Legislative Assembly session 2024 | मनोज जरांगे यांच्या सुरुवातीपासून एक, एक मागण्या मान्य केल्या. त्या आपण मान्य केल्या. परंतु आता जरांगे यांची भाषा बदलली. आता ते महाराष्ट्र बेचिराख करण्याबाबत बोलू लागले. आपण हा डाव उधळल्याचे त्यांनी म्हटले. मग महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना कोणाची होती? याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली.
मुंबई, दि. 27 फेब्रुवारी 2024 | मराठा आंदोलनासंदर्भातील पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी सभागृहातून त्यांनी मनोज जरांगे यांच्या मागे कोण आहेत? हा प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी त्यांनी केली. आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्राला बेचिराख करण्याची भूमिका घेतली जात असेल तर विरोधी पक्ष आमच्यासोबत असेल. संपवून टाकू, निपटून टाकू, बोलण्याची हिंमत जरांगेंमध्ये कशी आली. आधी भुजबळ, मग उपमुख्यमंत्री आता मुख्यमंत्र्यांना धमकी दिली गेली. यामुळे जरांगे यांच्या मागे कोण आहेत? ते समोर येण्यासाठी एसआयटी चौकशीची मागणी आशिष शेलार यांनी केली.
आशिष शेलार यांचे अनेक प्रश्न
मनोज जरांगे यांच्या सुरुवातीपासून एक, एक मागण्या मान्य केल्या. त्या आपण मान्य केल्या. परंतु आता जरांगे यांची भाषा बदलली. आता ते महाराष्ट्र बेचिराख करण्याबाबत बोलू लागले. आपण हा डाव उधळल्याचे त्यांनी म्हटले. मग महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना कोणाची होती? याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली.
देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एकेरी उल्लेख केला गेला. आतापर्यंत कुठेही फडणवीस यांचे वात्रट भाषण झाले नाही. त्यांनी कायदा आणि संविधाननुसार भाषण केले आहे. फडणवीस यांच्यासंदर्भात जरांगे म्हणतात, तुला निपटून टाकू. आता प्रकरणात मुंबई उच्च न्यायालय म्हणतो, तुम्ही गांभीर्याने घ्या. शांत बसू नका. मराठा समाजाच्या पाठिशी आम्ही आहोत. परंतु ही भाषा करण्याची हिंमत आली कोठून, असा सवाल आशिष शेलार यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा उधळण्याची धमकी
महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा उधळून टाकू, असे जरांगे यांनी म्हटले. तुम्ही कोण आहात. प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ देणार नाही, असे का म्हटले जाते. त्यांच्या मागे कोण आहे, असे सांगत शेलाय यांचा रोख एका राजकीय पक्षाकडे होता.
तो कारखाना कोणाचा
ज्या कारखान्यात बैठका झाल्या आहे, तो कारखाना कोणाचा आहे, घटनास्थळी दगडफेक करण्यासाठी ती दगडे कोठून आणली गेली. हा सर्व प्रकार एका घरातून चालला होता. एका कारखान्यातून चाललो होता. या आंदोलनात जीसीपी आणले गेले, ते कोणत्या पक्षाचे आहे. कोणत्या नेत्याचे आहे. या प्रकरणात एका पक्षाची भूमिका महत्वाची आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, असे शेलार यांनी म्हटले आहे.