‘मी पहिला गौप्यस्फोट करतोय, त्यांची सर्व मतं…’, आशिष शेलार यांचा ठाकरे गटाबाबत मोठा दावा

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबाबत मोठा दावा केला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांना फार मतदान होणार नाही. उलट ठाकरे गटातच दुफळी निर्माण होईल आणि त्यांची मते भाजपच्या उमेदवाराला मिळतील, असा मोठा दावा आशिष शेलार यांनी केलाय.

'मी पहिला गौप्यस्फोट करतोय, त्यांची सर्व मतं...', आशिष शेलार यांचा ठाकरे गटाबाबत मोठा दावा
आशिष शेलार आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 10:46 PM

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्यात लढत आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा आज मुंबईत रंगशारदा नाट्यगृह येथे विजय संकल्प मेळावा पार पडला. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटाबाबत मोठा दावा केला. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांना पूर्ण मतं पडणार नाहीत. त्यांच्यात दुफळी निर्माण झाल्यामुळे त्यांची सर्व मतं आपले उमेदवार किरण शेलार यांना पडतील, असा मोठा दावा आशिष शेलार यांनी केला. “देवेंद्रजी हे रंग शारदेचं नाट्यगृह फिरतं झालेलं आहे. काल एका पक्षाचा मेळावा, आज सकाळी एका पक्षाचा मेळावा आणि आता आपला विजयी संकल्प मेळावा सुरु आहे. आपले किरण शेलार उभे आहेत. विचाराने ते संघ विचाराचे पक्के आहेत. गिरण गावात राहणारे आहेत. सुशिक्षित आहेत, लेखक आहेत”, असं देखील आशिष शेलार यावेळी म्हणाले.

“देवेंद्रजींना मी अजून एका गोष्टीला मानलं. शेलार आहेत म्हणून म्हणत नाही, देवेंद्रजी यांनी हिरा शोधताना बरोबर निवडला. ज्या भागातून निवडला त्या भागाचं नाव वरळी विधानसभा आहे. काही दिवसांपूर्वी बातम्या येत होत्या की युवासेनेने नोंदणी केली आहे. ते मतदान अनिल परब यांना देणार नाहीत. मी पहिला गौप्यस्फोट करतोय की, त्यांची सर्व मतं शेलार यांना पडणार आहेत आणि त्यांच्यात दुफळी निर्माण होणार आहे. उबाठाची वरळीतील मतं अनिल परब यांना मिळणार नाहीत. त्यांच्यात दुफळी झालेली आहे”, असा मोठा दावा आशिष शेलार यांनी केला.

‘उद्धवजी यांचं असं झालंय, केळीचं झाड लावायचं आणि…’

“रंगमंच फिरता. त्यामध्ये उबाठा गटाचं भाषण पाहिले तर आम्ही तरुणांसाठी काय करणार आहोत? यावर काहीच भाष्य केलं नाही. कालच्या मेळाव्यात उद्धवजी म्हणाले, देवेंद्रजी मला खरंतर बोलायचं नव्हतं, उद्धवजी यांचं असं झालंय, केळीचं झाड लावायचं आणि त्याला रताळी आली की विचारायचं. तुमचं भाषण पूर्ण होण्याआधी तिकडे दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं”, असं आशिष शेलार म्हणाले.

“माझा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना सवाल आहे की, तुम्ही कुठे आहात? असं लोक प्रश्न विचारत आहेत. हे सर्व सार्वजनिक कार्यक्रमात जायला तयार नाहीत. मोदीजींनी शेतकऱ्यांना फटाफट मदत केली. सकाळी मनसेचा मेळावा झाला. त्यातलं एक वाक्य लिहून आणलं आहे. उद्धवजींना मराठी माणसाने केव्हाच नाकारले आहे”, असा दावा आशिष शेलार यांनी केला.

“याकूब मेमनची कबर सजवणाऱ्या काही मुस्लिम बांधवांना तर शिवसेना भवनमध्ये जाऊन झालं गेलं विसरून जावा असं म्हणत होते. आज आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता. तेव्हा तिकडे काही मुस्लिम बांधव शुभेच्छा द्यायला गेले होते. तिथं मुस्लिम बांधवाणी नंगी तलवार दिली ही तलवार जर हिंदू बांधवांवर उगरायला दिली असेल तर हे भाजपचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत”, असं आशिष शेलार म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.