VIDEO: सुनील पाटील प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, आशिष शेलार यांची मागणी

आर्यन खान प्रकरणात नवा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. सुनील पाटील नावाचा व्यक्ती या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचं उघड झालं आहे. (ashish shelar demand cbi enquiry to sunil patil issue)

VIDEO: सुनील पाटील प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, आशिष शेलार यांची मागणी
ashish shelar
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 5:22 PM

मुंबई: आर्यन खान प्रकरणात नवा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. सुनील पाटील नावाचा व्यक्ती या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचं उघड झालं आहे. सुनील पाटील यांचा संबंध राष्ट्रवादीशी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी केली गेली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. सुनील पाटील तुमचा सदस्य आहे का? त्यावर तुमचं उत्तर काय? धुळ्याचे सुनील पाटील यांच्याशी राष्ट्रवादीचा थेट संबंध काय? आम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना संधी देत आहोत गुमानपणे कबुल करा. बऱ्याच गोष्टी आमच्या हाती लागल्या आहेत. त्यामुळे बाथरुमच्या आत शौचगृह असतं तिथूनही तोंड दाखवता येणार नाही. हा सुनील पाटील आर आर पाटील यांचं नाव बदनाम करत आहे. आज ते हयात नाहीत. त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. सुनील पाटील आबांचे नाव घेत आहेत. राष्ट्रवादीची आग मस्तकात जात नाही का? असा सवाल शेलार यांनी केला.

पाटीलवर गुन्हा दाखल करा

सुनील पाटील यांनी आरआर पाटील यांचं नाव घेतलं. आताचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं नाव देखील घेतलं जातं आहे. त्यामुळे सुनील पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी परवानगी द्यावी. परवानगी दिली नाही तर मग सरकारचे हात काळे आहेत हे स्पष्ट होईल, असा दावाही त्यांनी केला.

शिवसेनेला हात जोडून विनंती

किरण गोसावी प्रकरण सीबीआयला देण्यात यावं. चिकू पठाण दाऊदचा हस्तक आहे. त्याच्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख सह्याद्री अतिथीगृहात बैठका घेतात. ही गंभीर बाब आहे. राज्यातील प्रोटेक्शन मनी चिकू पठाण करत होता. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी. शिवसेनेला हात जोडून विनंती आहे, त्यांनी राष्ट्रवादीचे नेते काय करत आहेत ते पाहावं, असं शेलार म्हणाले.

कंबोज यांचे आरोप काय?

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सुनील पाटील यांच्या नावाची माहिती दिली होती. गृहमंत्री ज्या व्यक्तीला भेटणार असतात त्या व्यक्तीची सर्व माहिती गृहमंत्र्यांना पोलीस विभागाकडून दिली जाते. तरीही देशमुख या चिंकू पठाणला भेटले. त्यामुळे त्यांचे आणि या ड्रग्ज पेडलरशी काय संबंध आहेत? राष्ट्रवादी काँग्रेस ड्रग्ज पेडलरांची पाठराखण करत आहेत का? सुनील पाटील यांचा या संपूर्ण प्रकरणाशी आणि राष्ट्रवादीचा काय संबंध आहे? याची उत्तरे राष्ट्रवादीने दिली पाहिजेत, अशी मागणी कंबोज यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप असणारे सुनील पाटील कोण?; वाचा सविस्तर

सुनील पाटील यांचं बदल्यांचं रॅकेट, गृहमंत्र्यांशी कनेक्शन कसे?, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा: मोहित कंबोज

कंबोज यांच्या आरोपांनंतर नवाब मलिकांचं ट्विट, उद्या वानखेडे आर्मीचा पर्दाफाश करणार

(ashish shelar demand cbi enquiry to sunil patil issue)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.