केवळ राजीनामा देऊन चालणार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा; आशिष शेलार यांची मागणी
आशिष शेलार यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. (ashish shelar first reaction on sanjay rathod resignation)

मुंबई: पूजा चव्हाण प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. पण केवळ राजीनामा दिला म्हणून चालणार नाही, याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. (ashish shelar first reaction on sanjay rathod resignation)
आशिष शेलार यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. केवळ राठोड यांच्या राजीनाम्याने चालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करावीच लागेल. याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे लागतील. तरच पूजा चव्हाणची हत्या झाली की आत्महत्या झाली हे समजेल. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागेल, तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात चालढकल का केली? असा सवाल शेलार यांनी केला आहे.
चौकशी कशाच्या आधारे?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सखोल चौकशी केली जात आहे, असं सांगितलं जात होतं. पण कोणताही गुन्हा दाखल न करता पोलीस कशाच्या आधारावर चौकशी करत होते? कुणाची चौकशी करत होते? असा सवालही त्यांनी केला.
20 दिवस चालढकल का केली?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही राठोड यांच्या राजीनाम्याचं स्वागत केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी उशिरा का होईना चांगला निर्णय घेतला आहे. पण त्यांनी ठाकरी बाणा आधीच दाखवला असता तर बरं झालं असतं, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात 20 दिवस चालढकल का केली? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केलं आहे.
राजीनामा हा सत्याचा विजय
भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी राठोड यांचा राजीनामा हा सत्याचा विजय असल्याचं म्हटलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणी त्यांची आजी शांताबाई राठोड यांचा जबाब नोंदवण्याचं काम वानवडी पोलीस ठाण्यात सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. (ashish shelar first reaction on sanjay rathod resignation)
संजय राठोड यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला! ‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं? https://t.co/ZL8H5uN95o @SanjayDRathods @OfficeofUT @ShivSena @Dev_Fadnavis @mipravindarekar @ChitraKWagh #SanjayRathod #PoojaChavanSuicide #PoojaChavan #uddhavThackeray #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 28, 2021
संबंधित बातम्या:
‘राजीनामा देण्यास तयार, पण चौकशीनंतरच तो मंजूर करा’, राठोडांची मुख्यमंत्र्यांना विनंती?
वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यानेच राठोडांवर कारवाई नाही, चौकशी अधिकाऱ्याला निलंबित करा: देवेंद्र फडणवीस
संजय राठोड सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, मोठ्या निर्णय होणार?
(ashish shelar first reaction on sanjay rathod resignation)