गोगावले, बच्चू कडू, पडळकर, शेलार, नितेश राणे मंत्री होणार?; मंत्रिपदासाठी कोणत्या 12 नावांची चर्चा?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हाही होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या शिवाय नव्या विस्तारात आशिष शेलार, नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांना संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

गोगावले, बच्चू कडू, पडळकर, शेलार, नितेश राणे मंत्री होणार?; मंत्रिपदासाठी कोणत्या 12 नावांची चर्चा?
bjp leaderImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 9:12 AM

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला अभय मिळालं आहे. त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारने त्याची तयारी सुरू केली आहे. तब्बल एक वर्षानंतर हा विस्तार होणार आहे. विस्ताराची तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी सरकार पातळीवर तशी लगबग सुरू झाली आहे. एवढेच नव्हे तर या नव्या विस्तारात 12 जणांचा शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या संभाव्य मंत्र्यांची नावेही व्हायरल झाली आहेत. त्यामुळे कुणाकुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नव्या मंत्रिमंडळात 12 जणांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यात शिंदे गटाकडून भरत गोगावले, संजय शिरसाट, राजेंद्र पाटील यड्रावकर, आणि बच्चू कडू यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भरत गोगावले यांचं प्रतोदपद गेल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. गोगावले यांचा मंत्रिमंडळात स्थान दिल्यास कोकणातील मंत्र्यांची संख्या तीन होणार आहे. उदय सामंत आणि दीपक केसरकर हे विद्यमान मंत्रिमंडळात मंत्री आहेत. शिंदे गटाकडून आणखी कुणाला संधी मिळणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

हे सुद्धा वाचा

भाजपकडून शेलार, बोर्डीकर आणि निलेंगेकर

तर भाजपकडून आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर, गोपिचंद पडळकर, मनिषा चौधरी, मदन येरावार, संजय कुटे, संभाजी निलेंगकर पाटील, मेघना बोर्डीकर आणि राणा जगजितसिंह यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. आशिष शेलार हे फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. पण त्यांना अल्पकाळ मिळाल्याने त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर प्रवीण दरेकर हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते, त्यामुळे त्यांनाही संधी दिली जात असल्याचं समजतं. विद्यमान सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाही. त्यामुळे मनिषा चौधरी आणि मेघना बोर्डीकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.

मिशन महापालिका

यंदाच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. नव्या विस्तारात त्याचं प्रतिबिंब दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. नव्या विस्तारात आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि मनिषा चौधरी या चार नेत्यांना संधी देऊन मुंबई सर करण्याचं नियोजन भाजपने केल्याचं सांगितलं जात आहे. भाजपच्या या गेम प्लानला किती यश मिळतं हे येणाऱ्या काळातच दिसून येणार आहे.

Non Stop LIVE Update
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.