BMC School : पालिकेच्या “दप्तर” दिरंगाईबाबत आदित्य ठाकरे उत्तर द्या, विद्यार्थ्यांच्या साहित्यावरून आशिष शेलार आक्रमक

मुंबई महापालिकेतर्फे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या,पेन्सिल, रेनकोटसह विविध 27 वस्तू देण्यात येतात पण निविदाच मंजूर न झाल्याने साहित्य आता पोहचायला ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता आहे तर दप्तर सप्टेंबरमध्येच मिळेल असा कयास आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

BMC School : पालिकेच्या दप्तर दिरंगाईबाबत आदित्य ठाकरे उत्तर द्या, विद्यार्थ्यांच्या साहित्यावरून आशिष शेलार आक्रमक
पालिकेच्या "दप्तर" दिरंगाईबाबत आदित्य ठाकरे उत्तर द्या, विद्यार्थ्यांच्या साहित्यावरून आशिष शेलार आक्रमकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 3:23 PM

मुंबई : सगळीकडे शाळा सुरू (School Reopen) झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेत हजेरी लावली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे शाळांमध्ये शुकशुकाट दिसून आला होता. यंदा मात्र विद्यार्थ्यांचं शैक्षणिक टाळण्यासाठी वेळेवर शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र मुंबईतील पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही शालेय साहित्य मिळाले नसल्याचा आरोप भाजपकडून (BJP) करण्यात आलाय. शाळां सुरु झाल्या पण मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शैक्षणिक साहित्य निवेदेतच अडकलेय. एरवी श्रेय घेण्यासाठी धावणाऱ्या पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या “दप्तर” दिरंगाईचे उत्तर द्यावे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विषयाकडे लक्ष वेधले. मुंबई महापालिकेतर्फे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या,पेन्सिल, रेनकोटसह विविध 27 वस्तू देण्यात येतात पण निविदाच मंजूर न झाल्याने साहित्य आता पोहचायला ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता आहे तर दप्तर सप्टेंबरमध्येच मिळेल असा कयास आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

काही वाटाघाटी बाकी आहेत का?

महापालिका शाळा इंग्रजी माध्यमाच्या करून एकिकडे “पब्लिक स्कूल” नावाने युवराजांच्या प्रसिद्धीची “आतिषबाजी”तर दुसरीकडे गरिब विद्यार्थ्यांना म्हणणार रेनकोट, पाटी, पेन्सिल, दप्तरा शिवाय वर्गात बसा..हा सगळा कारभार म्हणजे बडा घर पोकळ वासा, असे दुर्दैवाने म्हणावे लागते असेही आमदार आशिष शेलार म्हणाले. खर तर शाळा सुरु झाल्या त्याच आठवडाभरात हे साहित्य विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित होते. पण अद्याप टेंडरच मंजूर झाले नाही. काही वाटाघाटी बाकी आहेत का? विद्यार्थ्यांनी दप्तर, पेन, पेन्सिल शिवाय शाळेत जायचे का? त्यामुळे येत्या सात दिवसात जर हे साहित्य उपलब्ध झाले नाही तर विद्यार्थींसाठी भाजपा लढेल, असा इशारा ही आमदार आशिष शेलार यांनी दिला.

आता एका भेटीने काय होणार?

आता पावसाला सुरुवात झाल्यावर एका मिलन सबवेला भेट देऊन काय होणार? नालेसफाईची कामे वेळीच सुरु व्हावीत आणि पुर्ण व्हावी म्हणून शिवसेनेने कोणत्याही प्रकारे प्रयत्न केले नाहीत. भाजपाने नालेसफाईचा पाठपुरावा केला त्यामुळे टेंडर निघाले, कामांना सुरुवात झाली. आता एक भेट देऊन काय उपयोग? असा सवाल आमदार अँड आशिष शेलार यांनी केला. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मिलन सबवेला दिलेल्या भेटीबाबत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.