ठाणे पोलिसांचा भाग नसलेले सचिन वाझे पोस्टमार्टमच्या ठिकाणी कसे?; आशिष शेलारांचा सवाल
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात घडलेल्या घटना आणि योगायोग एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्या भोवती फिरत आहेत. (ashish shelar raise question on sachin waze in mansukh hiren death case)
मुंबई: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात घडलेल्या घटना आणि योगायोग एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्या भोवती फिरत आहेत. वाझे यांच्यावर या प्रकरणात संशयाची सूई आहे. ते ठाणे पोलिसांचा भाग नाहीत आणि एटीएसचाही भाग नाहीत. तरीही ते ठाण्यात हिरेन यांचा पोस्टमार्टम सुरू असलेल्या ठिकाणी हजर का आहेत? असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. (ashish shelar raise question on sachin waze in mansukh hiren death case)
आशिष शेलार यांनी मनसुख हिरेन प्रकरणावरून सचिन वाझेंबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सचिन वाझे हे ठाणे पोलिसांचा भाग नाहीत. ते एटीएसचाही भाग नाहीत. हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या भोवती संशयाची सूई फिरत आहे. असं असताना ते ठाण्यात पोस्टमार्टमच्या ठिकाणी हजर का आहेत? वाझे यांच्या या उपस्थितीमुळे संशय अधिकच बळावत आहे, असं शेलार म्हणाले. हिरेन मृत्यू प्रकरणात सरकारचा चौकशीचा फेरा आणि दिशा याबाबत संशय वाढत आहे. यात काही तरी काळंबेरं असल्याचं पुन्हा गडद होत आहे. त्यामुळेच या प्रकरणाची एनआयएकडे चौकशी देण्याच्या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
अर्धा तासात गृहमंत्र्यांचा यूटर्न का?
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत ठाणे पोलीस, मुंबई पोलीस हिरेन मृत्यूप्रकरणी योग्य काम करतील अशी भूमिका मांडली होती. मुंबई-ठाणे पोलिसांची शौर्यगाथा सांगणाऱ्या गृहमंत्र्यांना अवघ्या अर्ध्या तासातच हा तपास एटीएसकडे का द्यावा लागला? तपास कुणाकडे द्यावा हा राज्य सरकारचा अधिकार आहे. पण अर्ध्या तासात असं काय घडलं की त्यामुळे गृहमंत्र्यांना आपल्या भूमिकेवरून फिरावं लागलं. याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं, अशी मागणीही शेलार यांनी केली.
60 एन्काऊंटर, 16 वर्षानंतर कमबॅक, कोण आहेत वाझे?
नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले. सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे. सचिन वाझे यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर ‘जिंकून हरलेली लढाई’ नावाचे पुस्तक मराठीत लिहिले होते. शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेविड हेडली यांच्यावरही त्यांनी पुस्तकं लिहिली. सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेवलपर म्हणूनही त्यांनी काम केलं. वाझेंनी एक अॅपही तयार केले होते. ते एका एनजीओ संबंधित कामही करायचे. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते. (ashish shelar raise question on sachin waze in mansukh hiren death case)
संबंधित बातम्या:
मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमध्ये मनसुख हिरेन यांना कोण भेटलं?; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला
शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या केसेस कशा?; मनसेचा सवाल
(ashish shelar raise question on sachin waze in mansukh hiren death case)