हिरेन यांचे रुमाल कुणी पळवले, डायटोम टेस्ट का केली?; आशिष शेलारांचे सवाल
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी गंभीर आरोप केले आहेत. (ashish shelar raised question on mansukh hiren postmortem report)
मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी गंभीर आरोप केले आहेत. हिरेन यांचा पोस्टमार्टमच्या अहवालात त्यांच्या तोंडात कोंबलेल्या रुमालाचा उल्लेखच नाहीये. हा उल्लेख का केला नाही? हे रुमाल कुणी पळवले आहे? तसेच याप्रकरणातील पुरावा नष्ट करण्यासाठी डायटोम टेस्ट करण्यात आली का?, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. (ashish shelar raised question on mansukh hiren postmortem report)
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसुख हिरेन प्रकरणी अनेक सवाल उपस्थित केले. गेल्या काही दिवसात जे काही राज्यात सुरू आहे, त्याची उत्तरे राज्य सरकारला द्यावी लागतील. मनसुख हिरेन प्रकरण एनआयएकडे जाऊ नये असाच राज्य सरकारचा प्रयत्न होता. मात्र ठाणे कोर्टाने निर्णय दिल्यानंतर एनआयएकडे हा तपास देण्यात आला. एटीएसला हा तपास आपल्याकडेच ठेवायचा होता. त्यामागे पुरावे नष्ट करणे आणि चौकशीची दिशा भरकटवण्याचा त्यामागे कुहेतू होता का? असा सवाल शेलार यांनी केला.
रुमाल गेले कुठे?
हिरेन यांचा मृतदेह मिळाला तेव्हा त्यांच्या तोंडावर रुमालाच्या पट्ट्या होत्या. माझ्याकडे शवविच्छेदन अहवाल आहे. फॉरेन्सिकला जाण्याआधीच्या रिपोर्टमध्ये या रुमालाच उल्लेख नाही. रुमाल हा या प्रकरणातील ठोस पुरावा आहे. त्याचाच उल्लेख अहवालात नाही. मग हे रुमाल कुणी पळवले? पोलिसांनीच जाणीवपूर्वक या रुमालांचा उल्लेख टाळला का? असा सवालही त्यांनी केला.
रेकॉर्डिंगचं गोलमाल
शवविच्छेदन करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं अपेक्षित आहे. 5 मार्च 2021 रोजी दोन तास मनसुखचं पोस्टमार्टेम सुरू होतं. पण 1 मिनिटाच्या 7 रेकॉर्डिंग करण्यात आल्या. या व्हिडिओ रेकॉर्डिंग जोडल्या तर हा प्रकार कुणाच्या सांगण्यावरून केला. कोणत्या मंत्र्यांच्या सांगण्यावरून करण्यात आलं हे समोर येण्याची आवश्यकता आहे, असं ते म्हणाले.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
एखाद्याच बुडून मृत्यू झाला तर त्याची डायटोम टेस्ट आवश्यक असते, असं सरकारी वकील म्हणतात. आरोपीच्या लंग्स आणि शरीरात पाणी सापडलं नाही. मग डायटोम टेस्ट का केली. पुरावा नष्ट करण्यासाठी डायटोम टेस्ट करण्यात आली, असं ते म्हणाले. आमची लॅब नोंदणीकृत नसल्याचं कलिना लॅबने सांगितलं. मग जेजे रुग्णालयातील लॅबमध्ये पोलीस गेले. परंतु जेजेची लॅबही नोंदणीकृत नव्हती. मग त्यांनी टेस्ट का केली. ही स्क्रिनिंग टेस्ट असल्याचं जेजेने सांगितलं आहे. पण अंतिम टेस्ट हरियाणामध्ये होईल असं सांगण्यात आलं. डायटोम टेस्ट नाही आणि रुमालही नाही हे एटीएसच्या लक्षात आलं होतं, असंही ते म्हणाले.
मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न
20 मार्च रोजी सहा ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. त्यासाठी सरकारी पंचही बोलावण्यात आले होते. सरकारी पंच 4 वाजता एटीएस कार्यालयात आले होते. पण त्यांना छापे मारण्यापासून रोखण्यात आलं. कोणत्या अधिकाऱ्याने हे छापे रोखण्यात आले. हे समोर आलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. एटीएसचा तपास एनआयएकडे जाऊ नये असा सरकारचा प्रयत्न होता. आताची समितीही व्हाईट वॉश आहे. एका मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही त्यांनी केला. (ashish shelar raised question on mansukh hiren postmortem report)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 26 March 2021https://t.co/pgKeMxpqC5
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 26, 2021
संबंधित बातम्या:
वाझेंच्या घरात 62 जिवंत काडतुसे सापडली, एनआयएची कोर्टात धक्कादायक माहिती; फास आवळला?
मनसुख हिरेन-सचिन वाझेंची 17 फेब्रुवारीला भेट, CSMT भागातील सीसीटीव्ही फूटेज समोर
(ashish shelar raised question on mansukh hiren postmortem report)