हायड्रोजन सोडा, मलिकांना आता ऑक्सिजनची गरज पडेल, आशिष शेलारांचा घणाघाती हल्ला
नवाब मलिक यांची हतबलता आणि घालमेल इतकी होती की हायड्रोजन सोडा त्यांना ऑक्सिजनची गरज लागेल की काय अशी अवस्था झाली आहे, अशा शब्दात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर टीका केली. (ashish shelar slams nawab malik over allegation on devendra fadnavis)
मुंबई: हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे सकाळी लवंगीसुद्धा लावू शकले नाहीत. त्यांनी लवंगी लावण्याचा प्रयत्न केला त्यातही हात पोळले. नवाब मलिक यांची हतबलता आणि घालमेल इतकी होती की हायड्रोजन सोडा त्यांना ऑक्सिजनची गरज लागेल की काय अशी अवस्था झाली आहे, अशा शब्दात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर टीका केली.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर आरोपांची सरबत्ती केली. मलिक यांच्या या आरोपानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला प्रत्युत्तर दिलं. हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाझ भाटी, समीर वानखेडे, वसुली, आंतरराष्ट्रीय फोन अशी नावं आणि असे शब्द आणून त्यांनी खूप मोठं चित्रं निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. या सर्व प्रकरणाशी फडणवीसांशी संबंध जोडणं म्हणजे बिरबलाने जमिनीवर कोळसा ठेवून ऊंचावर ठेवलेली बिर्याणी शिजवण्यासारखा आहे. मलिक यांनी तसाच प्रयत्न केला. पण त्यात काहीच तथ्य नाही. राज्य सरकारच्या यंत्रणा कामाला लागूनही ते फडणवीसांवर आरोप लावू शकले नाहीत, असं शेलार म्हणाले.
गृहमंत्री तुमचे, मग गुन्हे का दाखल केले नाहीत?
मुन्ना यादव, हाजी अराफत आणि हाजी हैदर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांना विविध बोर्डावर अध्यक्ष म्हणून बसवलं होतं. यापैकी हाजी अराफत आणि हाजी हैदर यांच्यावर एकही गुन्हा नाही. त्यांची चौकशी केल्यानंतरच त्यांची नेमणूक करण्यात आली होती. मुन्ना यादववर एक आरोप आहे. त्याचं स्पष्टीकरण स्वत: मुन्ना यादव करतील. मला माहीत असलं तरी यात राष्ट्रवादीचे कनेक्शन आहे. यादवच त्यावर बोलतील. सर्व सोडा. तुमचं दोन वर्षापासून सरकार आहे. तुमच्या पक्षाकडेच गृहमंत्रीपद आहे. मग हाजी अराफत आणि हाजी हैदरवर तुम्ही एनसी सुद्धा का दाखल केली नाही? असा सवाल त्यांनी केला.
इमरान असलम शेख तर राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता
गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा. यात कोणताही गैरकारभार फडणवीसांच्या काळात झाला नाही. 14 कोटींच्या बनावट नोटांप्रकरणी अटक करण्यात आलेला हाजी अराफतचा भाऊ इम्रान आलम शेख हा तर काँग्रेसचा तत्कालीन सचिव होता. जेव्हा त्याच्यावर आरोप झाला तेव्हा तो काँग्रेसच्या पदावर होता. आता तुम्ही आरोप करताय, पण तो तर आता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मलिक हे तथ्यहिन बोलत असल्याचं सिद्ध होतं, असा दावा त्यांनी केला. हाजी हैदर हा बांगलादेश तर सोडा, पण मुंबईत त्यांच्यावर कोणताही आरोप नाही, असंही त्यांनी सांगितलं.
Video | कुविख्यात गुंड मुन्ना यादवशी तुमचा संबंध काय?; Nawab Malik यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल@nawabmalikncp #NawabMalik #DevendraFadnavis #NCP #BJP #Maharashtra #Politics pic.twitter.com/4DIMtS0022
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 10, 2021
संबंधित बातम्या:
नवाब मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बनंतर देवेंद्र फडणवीसांचं लगेचच ट्विट; म्हणाले, डुकराशी कुस्ती…
वेळ आली तर तुमची काळी संपत्ती आज ना उद्या काढणार, नवाब मलिक यांचा अमृता फडणवीसांना इशारा
नितेश राणेंकडून रियाझ भाटीचे उद्धव ठाकरे, शरद पवारांसोबतचे फोटो प्रसिद्ध, नवाब मलिकांना सवाल
(ashish shelar slams nawab malik over allegation on devendra fadnavis)