अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन: आशिष शेलार

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका शिवसेनेने केली होती. (ashish shelar slams shivsena over sharjeel usmani)

अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन: आशिष शेलार
ashish shelar
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 11:21 AM

मुंबई: हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका शिवसेनेने केली होती. त्याला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेने नागपूरमध्ये जाऊन हिंदुत्वाचा क्लास लावावा, असा टोला लगावतानाच अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन झाली आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. (ashish shelar slams shivsena over sharjeel usmani)

आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. शिवसेनेने हिंदुत्वावर भाष्य करू नये. हिंदुत्वाचा खरा क्लास लावावा. नागपूरच्या कार्यालयात तुन्ही नेहमी जात असता. आताही जा आणि हिंदुत्व समजून घ्या, असा टोला शेलार यांनी लगावला.

शरजीलला कोणत्या मंत्र्याने पळवून लावलं?

शरजील उस्मानी याला पळवून लावण्यात आलं आहे. त्याला पळवून लावण्यास कोणी मदत केली. सरकारमधील कोणत्या मंत्र्याचा हात आहे. एल्गारची पार्श्वभूमी माहीत असतानाही एल्गार परिषदेला परवानगी का देण्यात आली? असा सवाल करतानाच भाजपच्या आंदोलनानंतर सरकारला दोन दिवसाने जाग आली. त्यानंतर शरजीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरे तर शिवसेना ही अमिबालाही लाज वाटेल अशा पद्धतीने दिशाहीन झाल्याचंच हे लक्षण आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

राऊतांचं परदेशाशी कनेक्शन काय?

परराज्यातून कोणी टीका केली तर शिवसेनेसाठी तो महाराष्ट्रद्रोह ठरतो. पण परदेशातून कुणी आपल्या देशात नाक खुपसलं तर शिवसेनेला आनंदाच्या उकळ्या फुटतात. राऊत तुमचं परदेशाशी काय कनेक्शन आहे? लाल किल्ल्यावरील तिरंगा उतरवणं तुम्हाला योग्य वाटतं का? असा सवाल करतानाच शिवसेनेची अवस्था खाली डोकं वर पाय अशी झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

सुप्रिया सुळे उत्तर द्या

यावेळी शेलार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. सुप्रिया सुळे यांनी आंदोलक शेतकऱ्यांना जरूर भेटावं. हरकत नाही. पण बारामतीत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला परवानगी का दिली आहे? बारामतीत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग फायदेशीर ठरते अन् देशात ती चुकीची कशी ठरते? याचं उत्तर सुप्रिया सुळे यांनी द्यावं, असं आव्हानही त्यांनी दिलं. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरही टीका केली. पालिकेच्या अर्थसंकल्पात लपवाछपवी करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पातून मुंबईकरांनावर आर्थिक बोजा येणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (ashish shelar slams shivsena over sharjeel usmani)

संबंधित बातम्या:

VIDEO | राजकीय वैर संपवत केक भरवला, मनिष जैन-एकनाथ खडसेंचे प्रेमाचे पर्व

मी शेतकऱ्याची लेक, बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार : सुप्रिया सुळे

LIVE | एचआयव्ही ग्रस्त बालकांना शाळेतून हाकलले, बीडच्या पाली गावातील संतापजनक प्रकार

(ashish shelar slams shivsena over sharjeel usmani)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.