… तर अशा ट्रकभर एसआयटी लावाव्या लागतील, जाऊ द्या ना ताई; आशिष शेलार यांचा पलटवार
भाजप नेते गणेश नाईक यांच्या भाषणातील एका विधानाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली होती. (ashish shelar slams supriya sule over SIT enquiry remarks)
मुंबई: भाजप नेते गणेश नाईक यांच्या भाषणातील एका विधानाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. एसआयटी चौकशीच करायची तर बरेच विषय आहेत. आझाद काश्मीरपासून ते पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत अनेक विषय आहेत. अशा ट्रकभर चौकश्या कराव्या लागतील, जाऊ द्या ना ताई, असं म्हणंत आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. (ashish shelar slams supriya sule over SIT enquiry remarks)
आशिष शेलार यांनी ट्विट करून राष्ट्रवादीच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. गणेश नाईक यांच्या भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीर, बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे… आणि पूजा चव्हाणचा मृत्यू… अशा ट्रकभर “एसआयटी” कराव्या लागतील. जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय!, असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे.
महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद कसं मिळालं?
यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजपच्या यशावर काँग्रेसने केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. गेल्या महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपाला वॉर्ड रचनेमुळे मोठे यश मिळाले, असा जावई शोध चार वर्षांनी काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने लावला? सत्यच शोधायचे तर मग 40 नगरसेवक असताना महापालिकेत विरोधीपक्ष नेतेपद कसे मिळाले? सरकारमधे मांडीला-मांडी लावून आणि पालिकेत विरोधात कसे?, असा सवालच त्यांनी केला.
नाचता येईना अंगण वाकडे
समुद्राचे पाणी गोडे करण्यासारखे मोठे प्रस्ताव आले की शिवसेनेसोबत मिलीभगत कशी होते? नालेसफाई, एसटीपीपासून मलईदार विषयात काँग्रेस, शिवसेनेची युती कशी होते? उजेडात सुरू असलेल्या या तुमच्या काँग्रेसी “रवीराज” चे सत्यशोधन आता आम्ही करू जनतेसमोर! “नाचता येईना अंगण वाकडे”!, असे म्हणत शेलार यांनी काँग्रेस नेते रवी राजा यांच्यावरही टीका केली आहे. (ashish shelar slams supriya sule over SIT enquiry remarks)
नाईकांच्या घरात अन्न खाल्लं, अन्नाशी गद्दारी कधीच नाही
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना साताऱ्याच्या सभेचा फोटो लक्षात ठेवा हे सांगताना पुढचा महापौर हा महाविकास आघाडीचाच होईल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळेंनी नवी मुंबईतील सभेत व्यक्त केला होता. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. भाजपच्या एका बड्या नेत्याने महाराष्ट्रात आमचा ओव्हर कॉन्फिडन्स शिवाय राष्ट्रवादीकडून केलेलं इनकमिंग नडल्याची कबुली दिल्याचा किस्सा खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितला.
“गणेश नाईक पक्षात असताना त्यांचा पक्षात कसा सन्मान होत होता हे सांगताना ब्लँक पेपरवर सही होऊन नवी मुंबईत उमेदवारांची नावं टाकली जात होती. नाईकांच्या घरात अन्न खाल्लं आहे. त्यामुळे अन्नाशी गद्दारी कधीच नाही. ते कसेही वागले तरी,” असंही सुप्रिया सुळेंनी नमूद केलं होतं. (ashish shelar slams supriya sule over SIT enquiry remarks)
गणेश नाईक यांनी भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे..पुजा चव्हाणचा मृत्यू..अशा ट्रकभर “एसआयटी” कराव्या लागतील. जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 20, 2021
संबंधित बातम्या:
52 लोक शरद पवारांना सोडून गेले, एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास : सुप्रिया सुळे
Supriya Sule | सभागृहात ‘ते’ लेटर वाचून सुप्रिया सुळेंनी पवारांवरील मोदींचा आरोप खोडून काढला
(ashish shelar slams supriya sule over SIT enquiry remarks)