अशोक चव्हाणांना वाहतूक कोंडीचा फटका, मुंबईच्या रस्त्यांवर पायी चालण्याची वेळ
वाहतूक कोंडीमुळे अशोक चव्हाण यांना मुंबईच्या रस्त्यांवर पायी चालावं लागलं आहे (Ashok Chavan on Mumbai road).
मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. वाहतूक कोंडीमुळे अशोक चव्हाण यांना मुंबईच्या रस्त्यांवर पायी चालावं लागलं आहे (Ashok Chavan on Mumbai road). काँग्रेसच्या मुंबईतील गांधीभवन येथील कार्यालयात आज जनता दरबार भरवण्यात आला होता. या जनता दरबाराला जात असताना अशोक चव्हाण यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडीला कंटाळून अखेर अशोक चव्हाण गाडीतून बाहेर पडले आणि काँग्रेस कार्यालयापर्यंत पायी गेले (Ashok Chavan on Mumbai road).
‘वाहतूक कोंडींची समस्या अतिशय वाईट’
“वाहतूक कोंडींची समस्या अतिशय वाईट आहे. याशिवाय माझ्यामुळेदेखील लोकांची इथे बरीच गर्दी निर्माण झाली. मात्र, माझ्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असं मी म्हणणार नाही. मंत्रालयात प्रचंड गर्दी असते. लोक आपल्या समस्या घेऊन येतात. मात्र, त्यांना मदत करता येत नाही. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी दर बुधवारी पक्ष कार्यालयात येऊन लोकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी करत असतो. या निमित्ताने लोकांचं भेटणंही होतं”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.
याअगोदरही नेत्यांना बसलाय वाहतूक कोंडीचा फटका
मुंबईतील वाहतूक कोंडींचा याअगोदरही अनेक मंत्र्यांना फटका बसला आहे. शिवसेनेचे नेते विजय शिवतारे राज्यमंत्री असताना 19 जून 2018 रोजी त्यांना गोरेगाव ते चर्चगेट असा लोकल प्रवास करावा लागला होता. तर काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा पाउण तास वाहतूक कोंडीत अडकला होता.
याशिवाय भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनादेखील काही दिवसांपूर्वी वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. वाहतूक कोंडीमुळे त्यांना आपल्या गाड्यांचा ताफा सोडून लोकल ट्रेनने प्रवास करावा लागला होता.