AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई लोकल ऑगस्टमध्ये सुरु करण्याचा केंद्राचा विचार : पालकमंत्री अस्लम शेख

साधारण 400 पेक्षा जास्त लोकांना या गोष्टीचा उपयोग होईल, असेही अस्लम शेख (Aslam Shaikh on Mumbai Local Restart Again)  म्हणाले.

मुंबई लोकल ऑगस्टमध्ये सुरु करण्याचा केंद्राचा विचार : पालकमंत्री अस्लम शेख
Follow us
| Updated on: Jul 14, 2020 | 4:50 PM

मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना अनलॉक आणि मिशन बिगीन अगेनची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार राज्यात काही शिथीलता देण्यात आली आहे. मुंबई लाईफलाईन मानली जाणारी लोकल येत्या ऑगस्टपासून सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. (Aslam Shaikh on Mumbai Local Restart Again)

“मुंबईतील लोकल व्यवस्था ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू करणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यानुसार केंद्र सरकार याबाबत विचार करेल. हा विषय राज्य सरकारच्या अंतर्गत नाही,” असे अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

“मुंबईतील डबेवाल्यांचे मुंबईकरांशी गेल्या अनेक वर्षापासून नातं जुळलेलं आहे. सध्याच्या संकटात या डबेवाल्यांना थोडीशी मदत व्हावी यासाठी किराणा सामान तसेच इतर काही महत्त्वाच्या सेवा-सुविधांचा आवश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. साधारण 400 पेक्षा जास्त लोकांना या गोष्टीचा उपयोग होईल,” असेही अस्लम शेख म्हणाले.

“जुलै महिना अखेरपर्यंत ताळेबंद चालू राहणार असल्याने बकरी ईद देखील याच कालावधीमध्ये आहे. गणपती सण असा थोडा कमी प्रमाणात साजरा केला जातो. तसेच स्वरूपाची भूमिका बकरी ईद बाबत देखील असावी. याबाबत राज्य सरकारबरोबर आज चर्चा केल्या जाणार असून मुख्यमंत्री याबाबत भूमिका स्पष्ट करतील, “असेही अस्लम शेख यांनी सांगितलं. (Aslam Shaikh on Mumbai Local Restart Again)

मुंबईची लाईफलाईन हळहळू पूर्वपदावर

‘लॉकडाऊन’मध्ये थांबलेली मुंबई अनलॉक करण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली आहे. सोमवारी 15 जूनपासून मुंबईची लोकल पुन्हा सुरु करण्यात आली. मात्र यातून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत आहे. सर्वसामान्य प्रवाशांना यातून प्रवाशाची मुभा अद्याप देण्यात आलेली नाही.

सद्यस्थितीत मुंबईत 350 लोकल धावत आहेत. यात आवश्यक कर्मचारी, केंद्र, आयटी, जीएसटी, सीमाशुल्क, टपाल, राष्ट्रीयकृत बँका, एमबीपीटी, न्यायपालिका, संरक्षण आणि राजभवनाच्या कर्मचारी प्रवास करत आहेत.

संबंधित बातम्या : 

मुंबईतील कोरोना नियंत्रित, पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही : महापौर किशोरी पेडणेकर

Navi Mumbai Transfer | मिसाळ यांच्या बदलीची स्थगिती मागे, बांगर नवी मुंबई पालिका आयुक्त

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.