विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत बाका प्रसंग; राज्यपालांच्या हाती निवडणुकीची दोरी, पुढे काय होणार…?

विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला आणि शिवसेनेकडील वन खाते काँग्रेसला असा बदल होण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळाला नाही.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत बाका प्रसंग; राज्यपालांच्या हाती निवडणुकीची दोरी, पुढे काय होणार...?
भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र.
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 11:39 AM

मुंबईः विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत पुन्हा एकदा बाका प्रसंग उद्भवला असून, राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) स्वीकारणार की नाकारणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कारण यावरच उद्या होणाऱ्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

नेमके प्रकरण काय?

महाविकास आघाडी सरकारने विधानसभा अध्यक्ष निवडीचे नियम बदलले आहेत. आता सरकारने याबाबतचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवला आहे. अजून त्यांनी राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्ताव बघितला नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या राज्यात सुरू असलेला राज्यपालविरुद्ध राज्य सरकार संघर्षाचा सामना बघता राज्यपाल महाविकास आघाडी सरकारने पाठवलेला प्रस्ताव कितपत स्वीकारतील याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

पुढे काय होऊ शकते?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रस्ताव न स्वीकारत परत पाठवला, तर मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा कॅबिनेट घेऊन नवीन प्रस्ताव मंजूर करावा लागेल आणि कॅबिनेटने मंजूर केलेला प्रस्ताव पुन्हा एकदा राज्यपालांकडे पाठवावा लागेल. हा प्रस्ताव राज्यपाल स्वीकारणार की नाकारणार यावर विधान सभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

उमेदवारांची आज घोषणा

विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराची आज संध्याकाळी घोषणा होणार आहे. काँग्रेसकडे हे पद असल्याने हे पद कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला आणि शिवसेनेकडील वन खाते काँग्रेसला असा बदल होण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळाला नसून आज संध्याकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.

यांची नावे चर्चेत

विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे या चर्चेत आहेत. त्यातही भोरचे आमदार थोपटे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असताना काल एक ट्विस्ट आला आहे. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाचा राऊत यांचा कार्यकाळ संपला. त्यांना या पदावर पुन्हा संधी देण्यात आली नाही. त्यामुळे राऊत यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद जाण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

इतर बातम्याः

केंद्रात मोदींचे सुशासन, राज्यात ठाकरेंचे कुशासन; भाजप नेते जावडेकरांचा हल्लाबोल

भुजबळांचा धूमधडाका…पुरवणी अर्थसंकल्पात येवल्यासाठी 20 कोटी; 15 तलाठी इमारतींसाठी 4 कोटी 50 लाख मंजूर

83 Box Office Collection Day 2 : ख्रिसमसला चालली रणवीर सिंगची जादू, दुसऱ्या दिवशीही83ची जबरदस्त कमाई

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.