नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी तासाला 800 भाविकांना घेता येणार सिद्धीविनायकाचे दर्शन!
सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांसाठी खुशखबर आहे. (At most 800 devotees can visit Mumbai's Siddhivinayak Temple on 1st january)
मुंबई: सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांसाठी खुशखबर आहे. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीला तासाला 200 ऐवजी 800 भाविकांना सिद्धीविनायकाचं दर्शन घेता येणार आहे. भाविकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. (At most 800 devotees can visit Mumbai’s Siddhivinayak Temple on 1st january)
सिद्धीविनायक मंदिर न्यासाने भाविकांसाठी ही दिलासा देणारी बातमी दिली आहे. 1 जानेवारी रोजी नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने भाविकांसाठी प्रति तास 200 ऐवजी 800 भाविकांना बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे. QR कोड असलेल्या भाविकांनाच या दर्शन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ज्यांनी QR कोड घेतलेला नसेल त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. दर्शनाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 12.30 ते संध्याकाळी 7 तसेच रात्री 8 ते ९ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग निर्माण झाल्याने राज्यातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. लॉकडाऊन करण्यात आल्याने मंदिरं आणि प्रार्थनास्थळंही बंद ठेवण्यात आले होते. तब्बल नऊ महिने राज्यातील मंदिरे बंद होती. ही मंदिरं सुरू करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, भाजप, मनसेपासून ते राज्यातील अध्यात्मिक संघटनांनीही आंदोलन केलं होतं. मात्र, कोरोनाचा संसर्ग पाहता सरकारने मंदिर सुरू करण्यास नकार दिला होता. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी होताच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंदिरं सुरू करून भाविकांना मोठा दिलासा दिला होता. त्यामुळे राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली झाली होती. 15 नोव्हेंबर रोजी सिद्धीविनायक मंदिरही भाविकांसाठी सुरू झालं असून सध्या तासाला दररोज 200 भाविकांना दर्शनाचा लाभ देण्यात येत आहे. फक्त 1 जानेवारी रोजी ही संख्या 200 ऐवजी 800 करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना आताच दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. (At most 800 devotees can visit Mumbai’s Siddhivinayak Temple on 1st january)
VIDEO | SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 30 December 2020 https://t.co/xSWOe9xDc6 @CMOMaharashtra #superfastnews #TopNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 30, 2020
संबंधित बातम्या:
राज्यात 31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय
31 डिसेंबरलाही साई मंदिर खुलं राहणार, साई संस्थानचा निर्णय
(At most 800 devotees can visit Mumbai’s Siddhivinayak Temple on 1st january)