गँगस्टर डी. के. राववर कोर्ट परिसरात हल्ला
मुंबई : गँगस्टर डी. के. राव याच्यावर मुंबईत सेशन कोर्ट परिसरात हल्ला झाला आहे. डी. के. रावला सोमवारी सेशन कोर्टात हजर करण्यासाठी आणलं होतं, त्या दरम्यान त्याची साथीदार अनिल पाटील याच्याशी बाचाबाची झाली. हा वाद वाढून शिवीगाळीपर्यंत पोहोचला. त्यातूनच डी. के. राववर हल्ला झाला. एका बिल्डरकडून खंडणी प्रकरणासंदर्भात डी. के. राव आणि अनिल पाटील यांच्यात […]

मुंबई : गँगस्टर डी. के. राव याच्यावर मुंबईत सेशन कोर्ट परिसरात हल्ला झाला आहे. डी. के. रावला सोमवारी सेशन कोर्टात हजर करण्यासाठी आणलं होतं, त्या दरम्यान त्याची साथीदार अनिल पाटील याच्याशी बाचाबाची झाली. हा वाद वाढून शिवीगाळीपर्यंत पोहोचला. त्यातूनच डी. के. राववर हल्ला झाला.
एका बिल्डरकडून खंडणी प्रकरणासंदर्भात डी. के. राव आणि अनिल पाटील यांच्यात वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या घटनेवेळी पोलिसही सोबत होते. या हल्ल्यासंदर्भात कोलाबा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, कलम 323 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गँगस्टर डी के राव मोक्का गुन्ह्याअंतर्गत तुरुंगात आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक म्हणून डी. के. राव कुप्रसिद्ध आहे.