Video : स्वातंत्र्यदिनी मंत्रालयाच्या गेटवर अंगावर रॉकेल ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण पार पडत असताना एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या गेटवर आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. शेतकरी जळगाव जिल्ह्यातला असल्याचं सांगितलं जातंय. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतलंय.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याहस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण पार पडत असताना एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या गेटवर आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. शेतकरी जळगाव जिल्ह्यातला असल्याचं सांगितलं जातंय. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतलंय.
मंत्रालयाच्या गेटवर अंगावर रॉकेल ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
आज भारताचा 75 वा स्वातंत्रदिन, त्याचनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण पार पडलं. याचवेळी मंत्रालयाच्या गेटवर जळगाव जिल्ह्यातील शेतकरी सुनील गुजर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा या शेतकऱ्याने प्रयत्न केला. पण तिथे उपस्थित नागरिक, पोलिसांनी वेळीच हस्तत्रेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
शेतीत मोठं नुकसान झालंय… घर गहाण पडलंय.. मोठी आर्थिक चणचण आहे, त्यामुळे शेतकऱ्याने आत्महदनाचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातंय. संबंधित शेतकऱ्याला मंत्रालय पोलीस आणि मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
मुख्यंमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, संबोधनातून पुन्हा लॉकडाऊनचा इशारा
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण पार पडलं. यावेळी त्यांनी राज्यातील बांधवांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना माझं वंदन… महापुरुषांनी स्वराज म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय याचा अर्थ समजावून सांगितला… मला अभिमान आहे, महाराष्ट्रातील 4 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकं मिळाली, असं मुख्यमंत्री म्हणाले.
…तर पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल
आपल्या भाषणात त्यांनी आवर्जून कोव्हिड परिस्थितीचा उल्लेख करताना लॉकडाऊनचा पुन्हा एकदा इशारा दिला. कोरोनाचं संकट घोंघावतंय… आपण कोरोनाचा कहर अनुभवलाय… आरोग्य सुविधा आपण वाढवतोय… शिथीलता देत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून आपण शिथिलता देत आहोत… ज्यावेळी असं लक्षात येईल, की ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यावेळी आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
लसीकरणाने वेग घेतलाय… काल राज्यभरात साडे नऊ लाख लोकांचं लसीकरण झालंय… राज्यात लसीकरणाचा उच्चांक होतोय… आपण एक निश्चय करु, मी माझं राज्य, देश कोरोनामुक्त करणारच, कोरोनाला हद्दपार करणारच, असा नवा नारा त्यांनी यावेळी दिला.
हे ही वाचा :
…तर नाईलाजाने आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्र्याचा जनतेला स्वातंत्र्यदिनी पुन्हा इशारा