मलिकांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना मेंदूत इंजेक्शनची गरज, आधी जावयाकडे बघा, भातखळकरांचा पलटवार

भाजप नेते अतुल भातखळकरांनी नवाब मलिक यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या लोकांना ब्रेनमध्ये इंजेक्शन देण्याची गरज आहे, मात्र मेंदूच नसल्यान तिथही फारसा फायदा होत नाही अशी घणाघाती टीका केली आहे.

मलिकांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना मेंदूत इंजेक्शनची गरज, आधी जावयाकडे बघा, भातखळकरांचा पलटवार
मोदींच्या हस्ते उद्घाटन करा-भातखळकर
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 6:53 PM

मुंबई : ईडीचे सहसंचालक राजेश्वर सिंह यांनी व्हीआरएस घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी टीका केली होती. आता भाजप नेतेअतुल भातखळकर यांनी नबाव मलिक यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय तसेच मोदींचे PMO मधील सचिव ए.के. शर्मा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून नवाब मलिक यांनी ट्विट करत या एजन्सीमध्ये काम करणारे ते भाजपचे कार्यकर्ते होते. अशा पद्धतीने अजून बरीच कामे आहेत. या भाजप कार्यकर्त्यांबद्दल विरोधी पक्ष जे बोलत होते ते आता खरे ठरू लागले आहे. अशी टीका केली होती.

मलिक आधी जावयाकडे बघा

नवाब मलिक यांच्या टीकेला उत्तर देताना भाजप नेते अतुल भातखळकरांनी नवाब मलिक यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या लोकांना ब्रेनमध्ये इंजेक्शन देण्याची गरज आहे, मात्र मेंदूच नसल्यान तिथही फारसा फायदा होत नाही अशी घणाघाती टीका केली आहे. तसेच तुम्ही कुठली इंजेक्शन घेता हे तर साऱ्या जगाला माहिती आहे. नसेल माहिती तर तुमच्या जावयाला विचारा. आधी तुमच्या घरात काय सुरूय ते बघा आणि मग इतर ठिकाणी लक्ष घाला, तुमचे आमदार काय करत आहेत ते आधी बघा आणि मग भाजपवर बोलण्यासाठी तोंड उघडा, अशी टीका केली आहे.

नवाब मलिक सतत ईडीवरून भाजपला टार्गेट करताना दिसून येतात, तर त्यांच्यावर भाजप नेत्यांकडून पलटवार होताना दिसून येतात. गेल्या काही दिवासांपासून एनसीबी आणि ईडीवरून नवाब मलिक यांनी सतत भजापवर टीका केली. भाजप नेत्यांनीही वेळोवेळी त्यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. आता भातखळकरांच्या वक्तव्याने पुन्हा हा वाद वाढला आहे.

मंदीत संधी: देशात 3 महिन्यांत 3 कोटी रोजगार निर्मिती, महाराष्ट्र आघाडीवर!

Turmeric side effects : या कारणांमुळे हळदीचे अति सेवन ठरू शकते धोकादायक

‘जान है तो जहान है’, राजेश टोपेंनी चंद्रकांतदादांना मोदींच्या वक्तव्याची करुन दिली आठवण! कारण काय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.