Surpanakha: श्रीमंत कोकाटे म्हणतात, नाशिकवर पहिला हक्क शूर्पणखेचा; भातखळकर म्हणाले, भंपक पेकाटे

नाशिकचा पाया खऱ्या अर्थाने शूर्पणखेने घातल्याचा दावा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे. कोकाटे यांच्या या दाव्यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

Surpanakha: श्रीमंत कोकाटे म्हणतात, नाशिकवर पहिला हक्क शूर्पणखेचा; भातखळकर म्हणाले, भंपक पेकाटे
atul bhatkhalkar
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 12:45 PM

मुंबई: नाशिकचा पाया खऱ्या अर्थाने शूर्पणखेने घातल्याचा दावा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे. कोकाटे यांच्या या दाव्यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. हे श्रीमंत कोकोटे नाहीतर तर भंपक पेकाटे आहेत, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. बाकी विचाराल तर रामायण काल्पनिक… मात्र नाशिक वर पहिला हक्क शूर्पणखेचा… ‘भम्पक पेकाटे’, असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.

कोकोटे नेमकं काय म्हणाले?

नाशिकमध्ये विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडले. यावेळी एका परिसंवादात बोलताना श्रीमंत कोकाटे यांनी हे विधान केलं होतं. शूर्पणखा ही गोदा खोऱ्यातील देवी आहे. आजच्या नाशिकमध्ये तिचे वास्तव्य होते. त्याचे पुरावे आहेत. नाशिकच्या पायाभरणीत तिचा वाटा आहे. त्यामुळे नाशिक शहरावर शूर्पणखेचा पहिला अधिकार आहे, असं श्रीमंत कोकाटे म्हणाले.

नाशिकचं ‘शूर्पणनखा नगरी’ नामांतर करा

यावेळी त्यांनी नाशिकच्या नामांतराची मागणीही केली. नाशिक शहराची खरी ओळख लपवली जात आहे. त्यामुळे नाशिकला ‘शूर्पणखा नगरी’ असं नाव द्यावं, अशी मागणी त्यांनी केली.

पेशवे महाराष्ट्रावरील कलंक

यावेळी त्यांनी पेशव्यांवरही टीका केली. पेशा हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहेत, असं ते म्हणाले. पेशवे काळातच महिलांचा छळ झाला होता. कर न भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अत्याचार केले जात असत. कर मिळेपर्यंत शेतकऱ्यांना मारहाण केली जाई, असा दावाही कोकाटे यांनी केला.

महात्मा फुलेच पहिले शिवशाहीर

यावेळी त्यांनी महात्मा फुले हेच पहिले शिवशाहीर असल्याचा दावा केला. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सर्व प्रथम शोधून काढली. त्यांनीच 908 ओळींचा पोवाडा शिवरायांवर लिहिला. त्यामुळे तेच पहिले आणि खरे शिवशाहीर आहेत, असं त्यांनी सांगितलं. महात्मा फुलेंनी अन्यायाविरोधात लढा देऊन ज्ञान गंगा घरोघरी नेली, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: अजित पवारांमुळेच पदोन्नतीतील आरक्षण रद्द, पवार कुटुंब ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

वरळीत सिलिंडर स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी

OBC Reservation | आरक्षण संपवण्याचं काम कुणाच्या सांगण्यावर, पाठीमागचं इंगित काय, भुजबळांचा सवाल; ‘त्या’ लोकांना आवरा, फडणवीसांना आवाहन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.