“भाजप नागपूरच्या पराभवाचा आत्मचिंतन करणार”; भाजपच्या बड्या नेत्यानं पराभवाचं कारण सांगितलं

विकास कामे कधी पूर्ण होऊन दिली नाहीत आता अर्थसंकल्प पूर्ण होऊन देणार नाही असे म्हणणं म्हणजे हे अत्यंत हास्यास्पद आणि जनता विरोधी आहे असल्याची टीका अनिल परब यांच्यावर करण्यात आली आहे.

भाजप नागपूरच्या पराभवाचा आत्मचिंतन करणार; भाजपच्या बड्या नेत्यानं पराभवाचं कारण सांगितलं
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 9:55 PM

नागपूरः यंदा शिक्षक मतदासंघ निवडणुकीमध्ये भाजपने कोकणातली जागा मिळवली असली तरी नागपूरमध्ये मात्र पराभव पत्करावा लागला आहे. याबाबत अतुल भातळकर यांनी मुळात कोकणातली जागा ही पूर्वी शेकापची होती ती आम्ही खेचून घेतली असल्याचे सांगितले आहे. तरनागपूरमध्ये पराभव झाला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि याचं आत्मचिंतन आम्ही करू असंही त्यांनी सांगितले आहे. मात्र नागपूरमधील उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा नसून भाजप समर्थित होता हेही त्यांनी सांगितले.

शिक्षक परिषद ती निवडणूक लढवते तरीसुद्धा भाजप या निकालाचा आत्मचिंतन शंभर टक्के करणार असल्याचे अतुल भातखळकर यांनी सांगितले.

शिवसेना आमदार अनिल परब यांनी बीएमसीचा पूर्ण अर्थसंकल्प मांडल्यास आम्ही आंदोलन करू आणि गरज पडल्यास कोर्टात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

याबाबत बोलताना भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी अनिल परब यांना टोला लगावला आहे. भातळकर यांनी मुंबई महानगरपालिकेत आयुक्तांचं राज्य असल्याचे सांगत आयुक्तच करतील ते अंतिम असणार आहे हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे त्यावर आंदोलन करण्याची भाषा कोणीही करू नये असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

मुंबईकरांना विकास महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे पूर्ण अर्थसंकल्प मांडू देणार नाही म्हणजे काय ? असा सवाल करत तुम्ही सत्तेमध्ये असताना कधी विकास कामे केली नाहीत.

विकास कामे कधी पूर्ण होऊन दिली नाहीत आता अर्थसंकल्प पूर्ण होऊन देणार नाही असे म्हणणं म्हणजे हे अत्यंत हास्यास्पद आणि जनता विरोधी आहे असल्याची टीका अनिल परब यांच्यावर करण्यात आली आहे.

यंदा केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुंबई महाराष्ट्राला काय दिलं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांना बजेट समजत नाही हा पहिला मुद्दा आहे असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांना त्यांनी लगावला आहे.

तर त्यापुढे बोलताना अतुल भातखळकर यांनी मुंबई आणि महाराष्ट्राला मोदीजींच्या नव वर्षांच्या कालखंडात जितकं मिळालं तितकं मुंबई आणि महाराष्ट्राचे इतिहासात मिळालं नव्हतं असंही त्यांनी यावेळी सांगितले.

हे आदित्य ठाकरे यांना पुरेसे माहिती आहे. ज्या कोस्टल रोडचा जे कौतुक करतात त्या कोस्टल रोडच्या परवानग्या या केंद्र सरकारने दिल्या आहेत.

त्याच्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला मुंबईला फार मोठी मदत मोदी सरकारने केली असल्याचे सांगितले आमदार अतुल भातळखकर आपला अर्थसंकल्प या विषयावर बोलण्याकरिता ते डोंबिवलीत आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.