स्पेनचा दिग्गज टेनिस स्टार राफेल (Rafael Nadal) नदालने इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2022 (Australian Open 2022) चे विजेतेपद जिंकून नदालने 21 वे ग्रँड स्लॅम जिंकले आणि विश्वविक्रम केला. अशाप्रकारे, नदाल पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकणारा खेळाडू ठरला आहे. रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविचला मागे टाकत नदालने हा विक्रम केला आहे. नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा (Daniil Medvedev) 2-6, 6-7, 6-4, 6-4, 7-5 असा पराभव करत 5 तास 24 मिनिटे चाललेल्या आणि संघर्षपूर्ण अंतिम फेरीत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. सलग दुसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मेदवेदेवला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 35 वर्षीय राफेल नदालने पाच सेटपर्यंत चाललेल्या या सामन्यात त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या रशियन स्टारला कडवी झुंज दिली, तगडा खेळ करून थकवा वरचढ होऊ दिला नाही. 11 वर्षांपूर्वी याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत नदालला साडेपाच तासांहून अधिक काळ रंगलेल्या सामन्यात नोव्हाक जोकोविचविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. ग्रँडस्लॅम इतिहासातील ही सर्वात मोठी फायनल आहे. आता 11 वर्षांनंतर नदालने आणखी एक प्रदीर्घ फायनल खेळून जोकोविचला मागे सोडले.
नादालने इतिहास रचला
Another chapter is written ?@RafaelNadal defeats Daniil Medvedev 2-6 6-7(5) 6-4 6-4 7-5 to win his second #AusOpen title in an epic lasting five hours and 24 minutes.
⁰
?: @wwos • @espn • @eurosport • @wowowtennis #AO2022 pic.twitter.com/OlMvhlGe6r— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2022
या स्पर्धेच्या काही आठवड्यांपूर्वी नदालवर शस्त्रक्रिया करावी लागली होती आणि या स्पर्धेतील त्याचा सहभागही संशयाच्या भोवऱ्यात होता, पण नदालने हे सर्व मागे टाकून अनेक खडतर लढतींनंतर अंतिम फेरीतही प्रवेश केला. मेदवेदेव सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. फायनलची सुरुवात मेदवेदेवच्या शैलीत झाली आणि पहिले दोन सेट त्याने जिंकले. यानंतर नदालने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीच्या शैलीत आपली लढाई दाखवून ऐतिहासिक पुनरागमन केले.
Reunited with Norm ?#AusOpen • #AO2022 • @RafaelNadal pic.twitter.com/QAh0CPWYN0
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2022
पहिल्या सेटच्या पाचव्या आणि सातव्या गेममध्ये मेदवेदेवने सलग दोनदा नदालची सर्व्हिस तोडली. नदालने अनेक अनफोर्स्ड चुका केल्या, ज्यामुळे त्याने गुण मिळवण्याच्या सोप्या संधीही गमावल्या आणि मेदवेदेवने सहज सेट 6-2 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये नदालने दमदार कामगिरी करत मेदवेदेवची सर्व्हिस तोडून 4-1 अशी आघाडी घेतली. यादरम्यान नदालने काही उत्कृष्ट ड्रॉप शॉट्स खेळले, ज्याचे उत्तर मेदवेदेवकडे नव्हते. पण नदालच्या सर्व्हिसवर खेळ जिंकण्यासाठी मेदवेदेवने स्वतःच्या लढाऊ खेळातून पुनरागमन केले आणि प्रदीर्घ लढतीनंतर सेट टायब्रेकरमध्ये नेला. टायब्रेकरमध्येही चुरशीची स्पर्धा होती, पण मेदवेदेवने तो 7-5 असा जिंकून सेट 7-6 असा जिंकला.