मुंबई काँग्रेसमध्ये वादळ, बाबा सिद्दीकी यांच्या मनातली नेमकी सल काय? म्हणाले….

काँग्रेसला मुंबईत पुन्हा मोठं खिंडार पडलं आहे. कारण काँग्रेसमधला मुस्लिम समाजाचा मोठा चेहरा असलेला बडा नेता आता अजित पवार गटात सहभागी होण्याच्या तयारीत आहे. बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला अधिकृतपणे सोडचिठ्ठी दिली आहे.

मुंबई काँग्रेसमध्ये वादळ, बाबा सिद्दीकी यांच्या मनातली नेमकी सल काय? म्हणाले....
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 3:41 PM

मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 : काँग्रेसचे मुंबईतील मोठे नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसमधील बडे नेते मिलिंद देवरा यांनी देखील काही दिवसांपूर्वी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर बाबा सिद्दीकी सारख्या बड्या नेत्याने पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दीकी यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी काँग्रेसला गुड लक, असं म्हटलं आहे. बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. पण त्यांनी सध्या तरी याबाबत खुलासा केलेला नाही. पण आपण ज्या पक्षात जाणार त्या पक्षाची ताकद वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार, असं बाबा सिद्दीकी म्हणाले आहेत.

यावेळी पत्रकारांनी बाबा सिद्दीकी यांना काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यामागचं कारण विचारलं. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “ज्या परिवारात मी इतके वर्ष राहिलो त्यामध्ये मी अनेक मुद्द्यांवर बोलत राहिलो. त्याबाबत इथे पत्रकार परिषदेत बोलणं मला योग्य वाटत नव्हतं. काहीतरी झालं असेल म्हणून मी या कुटुंबातून निघतोय. मला ते इथे सांगणं योग्य वाटत नाही. माझ्या काँग्रेसला शुभेच्छा आहेत”, असं बाबा सिद्दीकी म्हणाले.

झिशान सिद्दीकी हे सुद्धा काँग्रेसचा राजीनामा देणार?

“आमदार झिशान सिद्दीकी हे समजूतदार आहेत. त्यांना चांगली समज आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय ते स्वत: घेणार. तुम्ही त्यांना विचारा. मी आता जिथे जाणार त्यांच्यासोबत मिळून पत्रकार परिषद घेऊन सांगू. मी खूप लहान माणूस आहे. मी जाणार आहे आणि माझा ट्रस्ट, माझे सहकारी, ज्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे, ते सर्व माझ्यासोबत येतील. येत्या 10 तारखेला एक छोटीसी सभा होईल, त्या सभेला राज्यसभरातील माझे समर्थक माझ्यासोबत येतील. मी ज्या पक्षात जाणार त्या पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार”, असं सूचक वक्तव्य बाबा सिद्दीकी यांनी केलं.

“अजित पवार हे कौतुकास्पदच आहेत”, असं वक्तव्य बाबा सिद्दीकी यांनी केलं. “पुढे काय होतं ते बघा”, असंही बाबा सिद्दीकी यावेळी म्हणाले. “माझा प्रवास हा इंदिरा गांदी यांच्यापासून राहुल गांधी यांच्यापर्यंत राहिला आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे मला पितासमान आहेत. माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत. कधीकधी काही गोष्टी बोलल्यानंतर समजलं जात नाही. त्यामुळे आपण आपला वेगळा निर्णय घेतो”, असं बाबा सिद्दीकी म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.