AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay shinde Encounter : अक्षय शिंदेसोबतचं शेवटचं बोलणं काय? आरोपीच्या आईचे खळबळजनक आरोप

बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये एन्काऊंटर केला आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह आता कळवा रूग्णालयामध्ये आहे. अक्षय शिंदेंच्या मृत्यूची बातमी समजल्यावर त्याच्या आईने पोलिसांवर गंभीर आरोप केले असून त्याच्यासोबत शेवटचं काय बोलणं झालं? याबाबत टीव्ही9 मराठीसोबत बोलताना माहिती दिली.

Akshay shinde Encounter : अक्षय शिंदेसोबतचं शेवटचं बोलणं काय? आरोपीच्या आईचे खळबळजनक आरोप
Follow us
| Updated on: Sep 23, 2024 | 8:46 PM

मी पोरासोबत बोलले, मम्मी चार्जशीट आली नाही मला कधी सोडवणार? मी बोलले थांब जरा बघू आपण. त्याच्या हातात एक कागद दिला होता तो मला दाखवत होता, त्याला सांगितलं, मला वाचता नाही येत. पोराला पैसे देऊन मारून टाकलं, माझ्या पोराची भरपाई करून द्या. आता आम्हीपण तिथे येतो आम्हाला पण गोळ्या घाला, मरायला तयार आहोत. दिवाळीला एक फटाका वाजवायला घाबरतो तो असं काही करू शकत नाही. आम्हाला घरातून मारत बाहेर केलं असून आम्ही स्टेशनवर फिरत आहोत. माझ्या पोराची मी वाट पाहत आहे, तो असं काही करू शकत नाही मला माहित आहे, असं अक्षय शिंदे यांची आई म्हणाली.

शाळेमध्ये कोणतरी दुसरं केलंय आणि माझ्या मुलावर आडवं टाकून त्याला पोलिसांनी नेलं आहे. 12 आणि 13 तारखेला झालं पण माझा पोरगा 17 तारखेपर्यंत शाळेत गेलाय, जर त्याने काही केलं असतं तर तो शाळेत कामाला गेला नसता. माझा पोरगा असं काही करणार नाही, तो एकदम साधा भोळा असून गरीब गाय आहे. मी कामावर जाताना त्याला रोड क्रॉस करताना त्याला हात पकडून नेत होते. गाड्यांनाही तो घाबरत होता, शाळेमध्ये सहा आया लोक आहेत त्या पळून गेल्या आहेत त्यांना का नाही पकडत? असा सवासलही अक्षय शिंदे याच्या आईने केला आहे.

विरोधकही या एन्काऊंटरवरून सरकारवर निशाणा साधत आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही? फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का? हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का? असे ट्विट नाना पटोले यांनी केली आहे.

पोलिसांची बंदूक खेचली. एपीआय निलेश मोरे जखमी आहे. अन्य पोलीस जखमी आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यामुळे ही घटना घडली आहे. ही प्राथमिक माहिती माझ्याकडे आली आहे. पोलीस चौकशी करतील. ज्याने या लहान बच्चूवर अन्याय केला. तेव्हा आरोपीला फाशी द्या असं विरोधक म्हणत होते. आता तेच विरोधक आरोपीची बाजू घेत असतील तर दुर्देव आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीची बाजू घेणं निंदाजनक आहे. त्याचा निषेध करावा तेवढा कमीच असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....