Central Railway: सेंट्रल रेल्वेसाठी गुड न्यूज, बदलापूर ते कर्जत रूटवर प्रवास सुखकर होणार, बदलापूर ते कर्जत मार्गासाठी सरकारचा निर्णय
Badlapur to Karjat Third and Fourth Line: बदलापूर ते कर्जत दरम्यान वाढलेली प्रवाशी वाहतूक आणि मालवाहतूक यामुळे या ठिकाणी नवीन रेल्वे लाईन टाकणे गरजेते होते. या निर्णयामुळे बदलापूर, वांगनी, सेलू, नेरळ, भिवपुरी, कर्जत शहरासाठी अधिक वेगवान वाहतूक होणार आहे.

Badlapur to Karjat Third and Fourth Line: मुंबई ते कर्जत दरम्यान लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना नेहमी अडचणीचा सामना करावा लागतो. सरकारच्या निर्णयामुळे आता या मार्गावरील प्रवास सुखकर होणार आहे. तसेच मुंबई-पुणे मार्गावर वाढत्या वाहतुकीस फायदा होणार आहे. सरकारने बदलापूर ते कर्जत दरम्यान 32.460 किलोमीटर लांब ब्राउनफील्ड रेल्वे परियोजनेस मंजुरी दिली आहे. त्यामुळे बदलापूर ते कर्जत मार्गावर तिसरी आणि चौथी लाइन टाकली जाणार आहे. त्याचा फायदा मुंबई ते कर्जत दरम्यान प्रवास करणाऱ्यांना होणार आहे. तसेच मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई कॉरिडोरसाठी होणार आहे. या कॉरिडोरवर ट्रॅफीकचा ताण कमी होणार आहे.
1,510 कोटी रुपये खर्च येणार
बदलापूर, वांगनी, सेलू, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत शहरांना तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईन प्रकल्पाचा फायदा होणार आहे. ही रेल्वे लाईन बदलापूर ते कर्जत मार्गावर टाकली जाणार आहे. त्यासाठी 1,510 कोटी रुपये खर्च येणार आहे. मुंबई रेल्वे विकास निगम या योजनेची अंमलबजावणी करणार आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार 50:50 टक्के खर्च करणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.
कल्याण ते बदलापूर प्रकल्प यापूर्वीच मंजूर
बदलापूर ते कर्जत दरम्यान वाढलेली प्रवाशी वाहतूक आणि मालवाहतूक यामुळे या ठिकाणी नवीन रेल्वे लाईन टाकणे गरजेते होते. या निर्णयामुळे बदलापूर, वांगनी, सेलू, नेरळ, भिवपुरी, कर्जत शहरासाठी अधिक वेगवान वाहतूक होणार आहे. कल्याण-बदलापूर हा 14 किमी लांबीचा तिसरा आणि चौथा मार्ग प्रकल्प मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प फेज-3 अ अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळाने यापूर्वीच सुरु केला. नवीन उपनगरीय कॉरिडॉरमुळे उपनगरीय रेल्वे सेवा वाढतील आणि या शहरांना त्यांच्या विकासासाठी पायाभूत सुविधांसह आवश्यक असलेली उपनगरीय रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.




भारतीय रेल्वे वेगवेगळ्या सुविधा निर्माण करत आहे. त्याचवेळी मुंबईतील उपनगरी लोकल सेवा अधिक चांगली करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून विरार-डहाणू मार्गावर तिसरी आणि चौथे लाईनचे काम सुरु केले आहे. हे काम 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे.