शिवतीर्थावर बाळासाहेब अवतरले, म्हणाले ‘आझाद मैदानात तो कुठला मेळावा?’

शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थिती लावली. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा चष्मा, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, तशीच दाढी. बाळासाहेब यांच्यासारखे दिसणारे हे हुबेहूब व्यक्तिमत्व. बाळासाहेब यांचे ते निस्सीम भक्त. पुण्यात अनेकदा त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती.

शिवतीर्थावर बाळासाहेब अवतरले, म्हणाले 'आझाद मैदानात तो कुठला मेळावा?'
BALASAHEB THACKAREY Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 6:55 PM

मुंबई | 24 ऑक्टोंबर 2023 : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत. आझाद मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तर शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांचा असे दोन मेळावे होत आहेत. दोन्ही गटाच्या मेळाव्याला येण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक एकवटत आहेत. या मेळाव्याला सुरवात होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. आझाद मैदान येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यातील व्यासपीठावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची ठेवण्यात आली आहे. पण, शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थिती लावली.

ठाण्यात सेंट्रल मैदान येथे 2012 साली बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती. ठाण्यातील ही बाळासाहेब ठाकरे यांची ही अखेरची सभा होती. या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या खुर्चीवरून भाषण केले. याच खुर्चीत बसून बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उद्धवला सांभाळा असे भावनिक आवाहन केले होते. तीच खुर्ची आझाद मैदानातील दसरा मेळाव्यातील व्यासपीठावर ठेवण्यात आली आहे. गेल्यावर्षीही शिंदे गटाच्या एमएमआरडीए मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात ही खुर्ची ठेवण्यात आली होती. बाळासाहेबांची आठवण म्हणून ही खुर्ची ठेवण्यात आलीय.

एकीकडे शिवसैनिकांना भावनिक साद घालण्यासाठी शिंदे गटाने अशी तयारी केली आहे. तर, दुसरीकडे शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थिती लावली. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा चष्मा, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, तशीच दाढी. बाळासाहेब यांच्यासारखे दिसणारे हे हुबेहूब व्यक्तिमत्व आहे पुण्याचे कांतीभाई मिश्रा. बाळासाहेब यांचे ते निस्सीम भक्त. पुण्यात अनेकदा बाळासाहेब ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली होती.

हे सुद्धा वाचा

ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी कांतीभाई मिश्रा शिवतीर्थावर आले. हा मेळावा एकनिष्ठ शिवसैनिकांचा मेळावा आहे. कोणतीही भावना घेऊन आलो नाही. मी दर वर्षी येत असतो. बाळासाहेब यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करत आहे. शिवसेनेचा आझाद मेदानातील मेळावा का खरा शिवसेनेचा मेळावा नाही. शिवसेना एकच आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचा.

बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दिसतो ही परमेश्वराची लीला आहे. मला पाहून अनेकांना मोठ्या साहेबांची आठवण येते. मी धन्य मानतो. तिकडची शिवसेना ही खरी शिवेसना नाही, चार इकडचे घेतले, चार तिकडचे घेतले म्हणजे काही शिवसेना होत नाही असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला. निवडणूक येऊ द्या म्हणजे शिवसेनेची खरी ताकद कळेल, असे आव्हानही त्यांनी दिले.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....