Balasaheb Thackeray Statue unveiled | बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा

| Updated on: Apr 15, 2021 | 3:44 PM

Balasaheb Thackeray Statue unveiling Live शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

Balasaheb Thackeray Statue unveiled | बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण

Balasaheb Thackeray Statue unveiling Live : मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. (Balasaheb Thackeray Statue Unveiling Ceremony)

यावेळी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

राज्याच्या जडणघडणीचा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान (Balasaheb Thackeray Statue Unveiling Ceremony) मोठं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण आज त्यांच्या 95 व्या जयंतीला (Balasaheb Thcakeray Birth Anniversary)  करण्यात आलं.

 बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा

हा पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. 9 फूट उंच आणि 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे.

कार्यक्रमाला कोण उपस्थित राहिले

बाळासाहेबांचे निकटचे स्नेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची विशेष  उपस्थिती आहे.  महापौर किशोरी पेडणेकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  होत्या.

 मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र

नोव्हेंबर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा सोहळा शिवाजी पार्कात घेण्यात आला. या सोहळ्याला देशभरातले प्रमुख नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण होतं. राज ठाकरे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर राज-उद्धव एका मंचावर आलेले नव्हते. त्यानंतर आज दुसऱ्यांदा उद्धव-राज जवळपास पंधरा महिन्यांनी एका मंचावर आले. (Raj Thackeray and Uddhav Thackeray)

बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर 2015 ला गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. 9 फूट उंचीचा पुतळा, 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप), चबुतरा सह 11 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे.

गेले काही वर्ष हा पुतळा लालफितीत अडकला होता. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार सत्तेवर येताच हा पुतळा उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यात आल्या आहेत.

Balasaheb Thackeray Statue Unveiled

संबंधित बातम्या :

….. तर मुख्यमंत्रिपदानंतर उद्धव आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र येणार!

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Jan 2021 05:59 PM (IST)

बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि उदय सामंत कार्यक्रमस्थळी पोहोचले

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मातोश्रीवरुन थोड्याच वेळात रवाना होणार आहे. 6 वाजता राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि उदय सामंत कार्यक्रमस्थळी पोहोचले आहेत.

  • 23 Jan 2021 05:57 PM (IST)

    शरद पवार सिल्वर ओकवरुन कार्यक्रमस्थळाकडे रवाना

    शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मातोश्रीवरुन थोड्याच वेळात रवाना होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. शरद पवार थोड्याच वेळात कार्यक्रम स्थळी पोहोचतील. 6 वाजता राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे.

  • 23 Jan 2021 05:50 PM (IST)

    Balasaheb Thackeray Statue unveiling Live | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमस्थळाकडे रवाना

    शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मातोश्रीवरुन कुलाबा येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत . 6 वाजता राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे.

  • 23 Jan 2021 05:47 PM (IST)

    Balasaheb Thackeray Statue unveiling Live | राज ठाकरे, संजय राऊत कार्यक्रमस्थळी पोहोचले

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत कुलाबा येथील कार्यक्रमस्थळी पोहोचले आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ देखील याठिकाणी उपस्थित आहेत.

  • 23 Jan 2021 05:17 PM (IST)

    उद्धव ठाकरे थोड्याच वेळात मातोश्रीवरुन रवाना होणार

    शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मातोश्रीवरुन थोड्याच वेळात रवाना होणार आहे. 6 वाजता राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे.

  • Published On - Jan 23,2021 6:03 PM

    Follow us
    कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
    कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
    सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
    सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
    सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
    सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
    सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
    सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
    सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
    सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
    लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
    लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
    'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
    'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
    ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
    ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
    ...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
    ...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
    सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
    सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.