Balasaheb Thackeray Statue unveiled | उद्धव ठाकरेंची वाट बघता बघता राज ठाकरेंना कोण कोण भेटलं?
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज पार पडलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे अनेक नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या निमित्त मुख्यमंत्री उद्धव […]
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज पार पडलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे अनेक नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. 14 महिन्यांनंतर या दोन भावांची भेट झाली. (Raj Thackeray participates in the unveiling of the full-length statue of Balasaheb Thackeray)
राज ठाकरे कुणाकुणाला भेटले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचले. तत्पूर्वी 20 मिनिटे आधी राज ठाकरे कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. तेव्हा त्यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी झाली. त्यावेळी दोघांमध्ये काही संवादही झाला. त्यानंतर शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला.
पुढे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशीही राज ठाकरे यांची भेट झाली आणि दोघांमध्ये काही चर्चाही झाली. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचं आगमन झाल्यानंतर या सर्वच नेते एकत्र पाहायला मिळाले. त्यानंतर शरद पवार यांचं आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या एकमेव पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं.
हीच खरी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती
एकीकडे निवडणूक काळात किंवा अन्य राजकीय व्यासपीठावर हीच राजकीय मंडळी एकमेकांवर जोरदार टीका करत असतात, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असतात. पण अशा कार्यक्रमामध्ये मात्र राजकीय पक्षाचे एकत्र येतात. हे चित्र महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सांगणारं आहे, असंच म्हणावं लागेल.
राज ठाकरे आणि भुजबळांचे आरोप-प्रत्यारोप
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अनेकदा शेलक्या शब्दात टीका केली आहे. त्या टीकेला भुजबळांनीही वारंवार प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये सभा घेतली होती. तेव्हा राज ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा माझ्यावर घणाघाती टीका केली होती. मी देखील त्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. राजकारणात असं होत राहतं. है वैर विसरुन आम्ही पुढे आलो आहोत, असं भुजबळ यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
राज आणि उद्धव
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 14 महिन्यानंतर एकाच व्यासपीठावर आलेले या कार्यक्रमात पाहायला मिळाले. या संपूर्ण कार्यक्रमात हे दोन्ही बंधू पूर्णवेळ एकत्र होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर या दोघांनीही पुतळ्याचे छोटेछोटे बारकावे पाहिले. उद्धव ठाकरे यांनी राज यांना पुतळ्याबाबत काही माहिती दिल्याचंही यावेळी पाहायला मिळालं.
बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा
हा पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. 9 फूट उंच आणि 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे.
संबंधित बातम्या :
Balasaheb Thackeray Statue unveiling Live | बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण
आमचे मार्गदर्शक…. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ ट्विटची चर्चा
Raj Thackeray participates in the unveiling of the full-length statue of Balasaheb Thackeray