36 तासांच्या मेगा ब्लॉकला सुरुवात, अनेक गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये बदल, प्रवाशांसाठी जादा बसची व्यवस्था
मध्य रेल्वेच्या 36 तासांच्या मेगा ब्लॉकला सुरुवात झाली आहे. आज दुपारी दोन वाजेपासून ते सोमवार दहा जानेवारी पहाटे दोन वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकदरम्यान लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई : मध्य रेल्वेच्या 36 तासांच्या मेगा ब्लॉकला सुरुवात झाली आहे. आज दुपारी दोन वाजेपासून ते सोमवार दहा जानेवारी पहाटे दोन वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकदरम्यान लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही फेऱ्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत. मेगा ब्लॉकमुळे आज, उद्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ठाणे ते दिवादरम्यान 5 व्य आणि 6 व्य मार्गिकेच्या कामासाठी हा मेगा ब्लॉग घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
लोकलच्या वेळापत्रकात बदल
या मेगा ब्लॉगदरम्यान लोकलच्या फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ठाणे ते दिवा मार्गावर धावणाऱ्या सर्व लोकल या जलद गती मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंब्रा, ठाकुर्ली आणि कोपर दरम्यान कोणतीही ट्रेन थांबणार नाही. ब्लॉकदरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने ठाणे, मुब्रा, दिवा मार्गावर तीनशे जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे ते दिवादरम्यान 5 व्य आणि 6 व्य मार्गिकेवर या दरम्यान विविध कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये रेल्वे ट्रक कट, ओव्हरहेड वायर बदल असे विविध कामे करण्यात येणार आहेत.
यापूर्वीही घेण्यात आला आहे ब्लॉक
दरम्यान याच मार्गावर आधी देखील दोन ते तीन वेळेस मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. आज पुन्हा एकदा मेगा ब्लॉकला सुरुवात झाली आहे. वारंवार मेगा ब्लॉक घेण्यात येत असल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होत असल्याचे पहायाला मिळत आहे. तसेच प्रवाशांचे देखील हाल होतात. मात्र प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
किरीट सोमय्यांनी बोलताना भान ठेवावं, कोविड सेंटर काय कमाईचं साधन आहे का? गुलाबराव पाटलांचा पलटवार
डिझाईनर मास्कवरुन अजितदादांच्या सूचना, काल किशोरीताई म्हणाल्या मला ‘मॅचिंग’ची आवड, आज N95 घातला