बेस्ट चालक बस सुरु ठेऊन नियंत्रण कक्षात गेला अन् बसने पकडला वेग, कुर्लाच्या घटनेनंतर मुंबईत पुन्हा थरार
Mumbai Best Bus Accident: बेस्ट चालक बस सुरूच ठेवून नियंत्रण कक्षात गेला. त्यानंतर बस अचानक सुरू झालीच कशी? असा सवाल अनेकांना पडला आहे. बसने अचानक वेग पकडून एका टी स्टॉलला धडक दिली. त्यात जखमी झालेल्या दोघांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
Mumbai Best Bus Accident: मुंबईच्या कुर्लामध्ये बेदरकार बसच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत 42 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. मागील महिन्यात बेस्ट बसचा झालेल्या या अपघाताच्या आठवणी अजूनही ताज्या असताना मुंबईत बेस्ट बसचा पुन्हा एक थरार दिसून आला. मुंबईच्या विक्रोळी कन्नमवार नगर परिसरामध्ये पुन्हा एकदा बेस्ट बसचा थरार पहायला मिळाला. या घटनेत बेस्ट बसने दोन जणांना धडक दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बेस्ट बसच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बस चालक बस सुरु ठेऊन नियंत्रण कक्षात गेल्यानंतर बसने अचानक वेग पकडल्यामुळे हा प्रकार घडला.
नेमके काय झाले?
मुंबईच्या कन्नमवार नगर बेस्ट बस स्थानकात बस चालकाचा अजब प्रकार समोर आला. शनिवारी सकाळी विक्रोळी भागातील कन्नमवारनगर येथे बेस्ट बस चालक बस सुरू ठेवून नियंत्रण कक्षात गेला होता. यावेळी ही बस अचानक सुरू झाली. त्यानंतर बसने वेग पकडला. ही बस जवळ असणाऱ्या एका टी स्टॉलवर धडकली. या बसने दोन जणांना गंभीर जखमी केले. हा सर्व प्रकार पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट ऊसळली आहे. नेहमी गर्दी असलेल्या या भागात आज शनिवार असल्यामुळे गर्दी नव्हती. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
बेस्ट प्रशासन करणार चौकशी?
बेस्ट चालक बस सुरूच ठेवून नियंत्रण कक्षात गेला. त्यानंतर बस अचानक सुरू झालीच कशी? असा सवाल अनेकांना पडला आहे. बसने अचानक वेग पकडून एका टी स्टॉलला धडक दिली. त्यात जखमी झालेल्या दोघांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या ठिकाणी बस प्रवाशांची तसेच चाकरमान्यांची बस आणि रिक्षा पकडण्यासाठी मोठी गर्दी असते. सुदैवाने सुट्टीचा दिवस असल्याने मोठी दुर्घटना टळला आहे.
बसने वेग कसा पकडला? हा प्रकार कासा घडला? याची चौकशी बेस्ट प्रशासन करणार आहे. तसेच बस चालकावर काय कारवाई केली जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकारामुळे मुंबईकरांमध्ये पुन्हा घबराहट निर्माण झाला आहे.