दिवाळी संपली, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाही!

मुंबई : मोठ्या तोऱ्यात बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देण्याची घोषणा झाली. अगदी रक्कमही माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस काही मिळाला नाही. बोनसची घोषणा कागदावरच राहिल्याचे सध्या चित्र असून, कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी आहे. बेस्ट प्रशासन आर्थिकदृष्टी तोट्यात आहे. बेस्ट प्रशासनाकडे पैसे नाहीत. हे एव्हाना सर्वश्रुत आहे. मात्र, आर्थिकदृष्ट्या तोट्यात आहोत, हे […]

दिवाळी संपली, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाही!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : मोठ्या तोऱ्यात बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देण्याची घोषणा झाली. अगदी रक्कमही माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस काही मिळाला नाही. बोनसची घोषणा कागदावरच राहिल्याचे सध्या चित्र असून, कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी आहे.

बेस्ट प्रशासन आर्थिकदृष्टी तोट्यात आहे. बेस्ट प्रशासनाकडे पैसे नाहीत. हे एव्हाना सर्वश्रुत आहे. मात्र, आर्थिकदृष्ट्या तोट्यात आहोत, हे माहित असातनाही बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर का केला, आणि केला तर मग दिला का नाही, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

5,500 रुपयांचा बोनस बेस्ट प्रशासनाने जाहीर केला होता. मात्र, प्रशासकीय तरतूद नसल्याने कर्मचाऱ्यांना बोनस देऊ शकत नाही, अशी कबुली बेस्ट प्रशासनाने दिली आहे.

बेस्टच्या 40 हजार कर्मचाऱ्यांच्या बोनसपोटी 22 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. बेस्टची सध्याची आर्थिक स्थिती पाहता, इतकी मोठी रक्कम प्रशासन खर्च करेल का, यावर आधीच शंका घेतली जात होती. मात्र, घोषणा केल्यावर पुन्हा बोनस न देणाऱ्या बेस्टबद्दल आता संताप व्यक्त केला जातो आहे.

एकीकडे मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळाल्यानं त्यांची दिवाळी आनंदात साजरी झाली आहे. मात्र, महापालिकेच्याच एका विभागाचे भाग असताना, बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहूनही बोनस काही हाती आला नाही.

आर्थिक स्थिती नसताना मोठ्या तोऱ्यात बोनस जाहीर करणाऱ्या बेस्टबद्दल कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.