2025 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात फक्त इलेक्ट्रिक बसेस, डेपोमध्ये चार्जिंग स्टेशन सुरु करणार : आदित्य ठाकरे

2025 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात 100% इलेक्ट्रिक बसेस येतील, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यानी दिलीय. आगामी काळात 1900 एलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जातील असेदेखील त्यांनी सांगितले.

2025 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात फक्त इलेक्ट्रिक बसेस, डेपोमध्ये चार्जिंग स्टेशन सुरु करणार : आदित्य ठाकरे
ELECTRIC BUSES
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 3:41 PM

मुंबई : सध्याच्या वातावरण बदलामुळे मुंईमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये भविष्यात फक्त इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच 2025 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात 100% इलेक्ट्रिक बसेस येतील. आगामी काळात 1900 एलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जातील, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यानी दिली.

आता फक्त इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणार 

वातावरणीय बदलाचा मुंबईवर मोठा परिणाम होत आहे. अचानकपणे वातावरण बदलल्यामुळे अतिवृष्टीसारख्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे सरकारतर्फे महत्त्वाचं पाऊल जात आहे. यापुढे एखादी बस घ्यायची असेल तर किंवा बस भाडेतत्वावर घ्यायची असेल तर ती फक्त फक्त इलेक्ट्रिक बस असेल. आम्ही बेस्टच्या डेपोमध्ये चार्जिंग स्टेशन सुरु करणार आहेत. अपारंपारिक विजेचा वापर करण्यावर आपल्याला यानंतर भर द्यावा लागेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईमध्ये आगामी काळात फक्त इलेक्ट्रिक बस

तसेच पुढे बोलताना त्यांनी मुंबईमध्ये आगामी काळात सगळ्या बसेस इलेक्ट्रिक असतील अशी माहिती दिली. “आतापर्यंत बेस्टच्या ताफ्यात 386 इलेक्ट्रिक बस आहेत. डबल डेकर बस ही मुंबईची ओळख आहे. आज 60 इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडलाय. आम्ही 200 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस लवकरच घेणार आहोत, वातावरणीय बदलांना तोंड देण्यासाठी या बसेस वापरणं खूप महत्त्वाचं आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

1900 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणार

तसेच 2025 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात 100% इलेक्ट्रिक बसेस येतील. आगामी काळात आम्ही 1900 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणार आहोत. महाराष्ट्राच्या अनेक शहरातदेखील आम्ही इलेक्ट्रिक बसेस चालवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेदेखील आदित्य यांनी सांगितले.

मुंबईकरांना चांगले रस्ते, सुखकर प्रवास या सगळ्या गोष्टी पुरवणार

माध्यमांशी बोलत असताना आदित्य त्यांना भाजप नेते नितेश राणे यांनी लिहलेल्या पत्राविषयी विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना या प्रश्नावर मी काही बोलू इच्छित नाही. विरोधकांना फक्त टीका करण्याचं काम राहिलेलं आहे.  आम्ही आमचं काम करून दाखवणार आहोत. आम्ही मुंबईकरांना चांगले रस्ते, सुखकर प्रवास या सगळ्या गोष्टी पुरवणार आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच लखीमपूरमध्ये घडलेली दुर्घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. जवळपास आठवडाभरानंतर केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक केली जाते. इतके दिवस युपी पोलीस काय करत होते असा सवाल करत, उद्याच्या महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा आहे, असे आदित्य यांनी सांगितले.

इतर बातम्या :

नरेंद्र मोदी हुकूशाहीवर विश्वास ठेवतात? शहांनी सांगितलं, का असे सवाल केले जातात?

‘मराठी माणूस नॉट अलाऊड’ म्हणणाऱ्यांवर मीरा रोडमध्ये अखेर गुन्हे दाखल, मराठी एकीकरण समितीच्या संघर्षाला यश

आधी चीन, नंतर लेबनॉन, आणि आता देश-महाराष्ट्र अंधारात बुडणार? विजेचं संकट कसं काय? वाचा सविस्तर

(best have 100 percent electric buses by 2025 purchase only electric bus information given by aditya thackeray)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.