काश्मीर पुनश्च भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाईल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
काश्मीर प्रदेश लवकरच आपले गतवैभव प्राप्त करील. पुनश्च देशाचे नंदनवन होईल, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
मुंबई : “काश्मीरची वाटचाल स्थैर्य व शांतीकडे सुरू झाली आहे. सर्वसामान्य लोक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये काश्मीरचे योगदान अनन्यसाधारण आहे. काश्मीर प्रदेश लवकरच आपले गतवैभव प्राप्त करील. पुनश्च देशाचे नंदनवन होईल,” असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. साहित्य, संस्कृती, भाषा संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य करणाऱ्या ‘हिंदी काश्मीर संगम’ या संस्थेच्या वतीने बुधवारी (21 जुलै) राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन व साहित्यिक व समाजसेवक यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
हिंदी काश्मीर संगम- काश्मिर अनुष्ठानच्या अध्यक्षा तसेच लेखिका व समाजसेविका डॉ. बिना बुदकी यांच्या “केसर की क्यारी में आग की लपटे आखिर कब तक” पुस्तकाचे तसेच ‘कश्मीर संदेश’ या नियतकालिकाचे राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले.
The magazine ‘Kashmir Sandesh’ brought out by Kashmiri Hindi Sangam and edited by Dr Beena Budki was also released on the occasion. Pandit Mahesh Acharya and Dinesh Barot, Member of Hindi Kashmiri Sangam were present. pic.twitter.com/TYiFZmTuo3
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 21, 2021
“पुन्हा काश्मीरला गतवैभव मिळविण्यासाठी प्रयत्न”
भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “काश्मीर 700 ते 800 वर्षांपूर्वी भारताचे गौरव समजले जात होते. आता पुन्हा काश्मीरला गतवैभव मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तेथील सामान्य नागरिकही शांती निर्माण होण्यासाठी सकारात्मक आहेत. नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तेथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.”
“स्वातंत्र्यप्राप्तीच्या 70 वर्षानंतर काश्मीरमध्ये शांततेसाठी प्रयत्न”
“काश्मीर ही अभिनवगुप्त, भरतमुनी, कल्हण प्रभृतींची तसेच काश्मीरी शैव तत्वज्ञानाची भूमी असून काश्मीरमध्ये भारतीय नाट्य शास्त्र, काव्य आणि साहित्याला महत्वपूर्ण स्थान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या 70 वर्षानंतर काश्मीरमध्ये शांततेसाठी प्रयत्न सुरू आहे. ते लवकरच यशस्वी होतील,” असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
“संस्कृत ही सर्व भाषांची जननी”
काश्मीरमध्ये हिंदीचा प्रचार आणि प्रसार होणे ही गौरवास्पद बाब आहे. मात्र, संस्कृत ही सर्व भाषांची जननी असल्याने संस्कृतचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. काश्मीरमध्ये हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या डॉ. बिना बुदकी यांचे राज्यपालांनी अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. गौरवार्थींनीही भविष्यात साहित्य – शिक्षा आणि लोकसेवेचे कार्य अवरित सुरू ठेवावे, अशी अशा राज्यपालांनी व्यक्त केली. यावेळी महेश आचार्य, हिंदी काश्मीरी संगमचे सदस्य दिनेश बारोट उपस्थित होते.
हेही वाचा :
पनवेलचे भूमिपूत्र अभिजीत पाटील ‘मेड इन इंडिया आयकॉन 2021’चे मानकरी, राज्यपालांच्या हस्ते सन्मान
पत्रकारांनी आवश्यक त्या ठिकाणी लेखणीची धार अधिक तीव्र करावी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
तौत्के चक्रीवादळात शेकडो लोकांचे प्राण वाचवले, जाँबाज़ नौदल अधिकाऱ्यांचा राज्यपालांकडून गौरव
व्हिडीओ पाहा :
Bhagat Singh Koshyari comment on Jammu and kashmir