आमच्या कार्यक्रमात तुम्ही काय करताय?; भाई जगताप पोलिसांवर भडकले

केंद्रातील मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे काँग्रेसने राज्यभरात ठिकठिकाणी निषेध नोंदवला आहे. तसेच पत्रकार परिषदा आणि कार्यक्रम घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली आहे. (bhai jagtap taunt bjp over modi government's 7th anniversary)

आमच्या कार्यक्रमात तुम्ही काय करताय?; भाई जगताप पोलिसांवर भडकले
bhai jagtap
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 12:41 PM

मुंबई: केंद्रातील मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे काँग्रेसने राज्यभरात ठिकठिकाणी निषेध नोंदवला आहे. तसेच पत्रकार परिषदा आणि कार्यक्रम घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली आहे. मुंबईतही मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने कार्यक्रम घेतला. यावेळी कार्यक्रमस्थळी पोलीस आल्याने काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप पोलिसांवर भडकले. त्यामुळे कार्यक्रमात काहीवेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. (bhai jagtap taunt bjp over modi government’s 7th anniversary)

मुंबईत काँग्रेसने मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी कार्यक्रमात पोलीस आल्याने भाई जगताप पोलिसांवर भडकले. आमच्या कार्यक्रमात तुम्ही काय करता? तुमचं काय काम? असा सवाल भाई जगताप यांनी पोलिसांना केला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर चक्क या कार्यक्रमातून पोलिसांना बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

70 वर्षात कमावलं, 7 वर्षात गमावलं

यावेळी भाई जगताप यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या 70 वर्षात देशानं जे कमावलं ते अवघ्या सात वर्षात कमावलं आहे. मोदी हे सर्वात अकार्यक्षम पंतप्रधान आहेत. केनिया सारखा देश आपल्याला मदतीसाठी विचारतो आणि केंद्र सरकार त्यांच्यापुढे कटोरा घेऊन उभे राहते ही लाजिरवाणीबाब आहे, अशी टीका जगताप यांनी केली.

तर पहिली अटक मला करा

गेल्या सात वर्षात भाजपने देशात काहीच विकास केला नाही. उलट देश भकास केला. गेल्या सात वर्षात काय केलं? काय प्रगती केली?, असा सवाल त्यांनी केला. आम्ही कायदा पाळून आंदोलन करत आहोत. जर आम्ही कायदा मोडून आंदोलन करत आहोत असं वाटत असेल तर पहिली मला अटक करा, असं ते म्हणाले. यावेळी आमच्या लहान मुलांच्या लस विदेशात का पाठवल्या?, अशा घोषणाही देण्यात आल्या.

आम्ही लोकांना रस्त्यावर येऊ दिलं नाही

लसीकरण केंद्र आहेत. मात्र लसीकरण केंद्रात अवघ्या 100 लस आहेत. लसीचा पुरवठा होत नाही. देशाला लस मिळत नाही. काँग्रेसने 70 वर्षात काय केलं हे कोणत्या तोंडाने विचारता? असा सवालही त्यांनी केला. आम्ही 70 वर्षात 13 लसींची निर्मिती केली. पण लोकांना रस्त्यावर येऊ दिलं नाही. आम्ही आतापर्यंत रुग्णांना विविध आजारांच्या लसी मोफत दिल्या आहेत. केंद्राने लसीकरण केलं म्हणजे उपकार केले नाहीत, असंही ते म्हणाले.  70 वर्षात गंगेत मृतदेह वाहून जाण्याचं चित्रं कधी पाहिलं नाही. देशात असं कधी घडलं नाही. तुम्ही सरकार म्हणून नागरिकांचं संरक्षण कसं करणार आहात? , असा सवालही त्यांनी केला. (bhai jagtap taunt bjp over modi government’s 7th anniversary)

संबंधित बातम्या:

अजूनही नेहरुंच्याच पुण्याईवर देश चाललाय; संजय राऊतांचा भाजपला टोला

Maharashtra Coronavirus LIVE Update : केंद्राने लसीकरण पुरवठा केला म्हणजे उपकार केले नाहीत : भाई जगताप

जनगणना केल्यावरच ओबीसींना न्याय मिळेल; विजय वडेट्टीवारांनी केल्या ‘या’ तीन मागण्या

(bhai jagtap taunt bjp over modi government’s 7th anniversary)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.