VIDEO: तेव्हा कुठे गेला होता तुझा राधासुता धर्म?, तर दोन हात करण्याची तयारी ठेवावी लागेल; भास्कर जाधव कडाडले
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अंगविक्षेप केला की माफी मागायला लावता.
मुंबई: शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अंगविक्षेप केला की माफी मागायला लावता. मात्र तुमचे सद्सय असं वागतात तेव्हा कुठे गेला होता राजा सुता तुझा धर्म, असा सवाल भास्कर जाधव यांनी शिवसेनेला केला आहे. तसेच संविधानानुसार जर राज्यपाल वागत नसतील तर आघाडी सरकारने दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
भास्कर जाधव यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सभागृहातील एक सदस्य सातत्याने टीका टिप्पणी करत असल्याचं मी विधानसभेच्या निदर्शनास आणून दिलं होतं. याबाबाबत आवाज उठवला होता. त्यांना समज देऊन देखील ते वारंवार टीका करत आहेत हे मी निदर्शनास आणून दिलं. तालिका अध्यक्ष म्हणून मी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं होतं. त्यामुळे माझ्यावर टीका सुरू होती, असं भास्कर जाधव म्हणाले.
माझा साधा प्रश्न होता
अध्यक्षांचा आदेश मानून आम्ही सभागृहातून बाहेर गेलो. 5 जुलैला मी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं होतं. त्यावेळी भाजपच्या नितेश राणेंनी माझ्याबद्दल अवमानकारक विधान केलं होतं. नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांना बिस्कीट देऊन 12 आमदारांचं निलंबन करायला लावलं असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुनचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या वेळी हरिभाऊ बागडे यांच्यासदर्भात काय बोलले असते, असा सवाल मी केला होता. साधा प्रश्न होता, अंगविक्षेप केला की माफी मागायला लावता. मात्र, तुमचे सदस्य असं वागतात तेव्हा कुठे गेला होता राजा सुता तुझा धर्म, असा सवाल त्यांनी केला.
कोकणात निवडणुकीत राडा होतोच
कोकणातील गेल्या 25 वर्षातील राजकारण पाहिलं तर लक्षात येतं की प्रत्येक वर्षी कुणाला तरी मारहाण किंवा जीव गमवावा लागतो. हे सातत्याने होत आहे. आताही तेच सुरू आहे, असंही ते म्हणाले.
राज्यपाल केंद्राचे किंवा राज्याचे नोकर नाहीत
राज्यपाल हे केंद्राचे किंवा राज्याचे नोकर नाहीत. राज्यघटनेच्या कलम 178 नुसार त्यांनी संविधानिक शपथ घेतलेली आहे. भारतीय संविधान सांगतं त्या प्रमाण राज्यपाल ऐकत नसतील तर महाराष्ट्र राज्य सरकारनं दोन दोन हात करायची तयारी ठेवावी लागेल, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं सांगतानाच विधानसभा अध्यक्ष पदाबाबत सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्यांनी एकत्र येऊन सामना करायचा आहे, असं ते म्हणाले.
Maharashtra Vidhan Sabha Live : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरुन संभ्रम, ठाकरे सरकार राज्यपाल संघर्षात काय घडणार?https://t.co/yYSbJpZd6T#ThackerayGovernment | #UddhavThackeray | #bhagatsinghkoshyari | #MaharashtraAssemblylive
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2021
संबंधित बातम्या: