Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | भास्कर जाधव नाराज, विधान भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होत म्हणाले, ‘आता इच्छा नाही’

विधिमंडळाचं सध्या अधिवेशन सुरु आहे. पण पायऱ्यांवर नतमस्तक होऊन, आता येणार नाही, असं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले आहेत. भास्कर जाधव असं का म्हणालेत? हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | भास्कर जाधव नाराज, विधान भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होत म्हणाले, 'आता इच्छा नाही'
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 11:59 PM

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी (Bhaskar Jadhav) विधिमंडळाच्या पाया पडत, पुन्हा येण्याची इच्छा नाही, असं म्हटलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्च पर्यंत आहे. पण आता येणार नाही, असं म्हणत भास्कर जाधव विधिमंडळातून निघाले. त्याआधी जाधव पायऱ्यांवर नतमस्तक झाले. गुढीपाडव्याच्या सुट्टीनंतर आणखी 3 दिवस अधिवेशन आहे. पण आपल्याला अधिवेशनात बोलू दिलं जात नाही. 2 लक्षवेधी होत्या. त्यापैकी एकही लक्षवेधी लागली नाही. त्यामुळं पुढचे 3 दिवस कामकाजात सहभागी होणार नाही, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

अर्थात भास्कर जाधवांनी उर्वरित 3 दिवसच अधिवेशनात येणार नसल्याचं म्हटलंय. पण कोकणातले त्यांचे प्रतिस्पर्धी रामदास कदमांनी, 2 दिवसांआधीच भास्कर जाधवांना राजकारणातून हद्दपार करण्याचा इशारा दिलाय. रामदास कदम भास्कर जाधवांवर का चिडले? हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे.

2009मध्ये गुहागरमध्ये जाधवांकडून पराभव झाला. त्यावेळी भास्कर जाधव राष्ट्रवादीत होते. 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांना 53 हजार 108 मतं मिळाली. तर शिवसेनेच्या रामदास कदमांना 40 हजार 32 मतं मिळाली. जवळपास 13 हजारांच्या फरकानं रामदास कदम पराभूत झाले. मात्र यामागे उद्धव ठाकरेंचाच हात असल्याचा आरोप, खेडच्या सभेतून रामदास कदमांनी केलाय.

कोकणातलं राजकारण सध्या तापलंय. राणे विरुद्ध ठाकरे हा सामना आपण पाहिलाय. पण रामदास कदम विरुद्ध भास्कर जाधव हाही सामना तीव्र होणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.