समीर वानखेडे यांनी शाहरुख खान याच्याकडून खरंच खंडणी घेतली? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

ड्रग्स कारवाईत ज्या समीर वानखेडेंच्या पाठिशी भाजप नेते उभे राहिले होते. त्याच वानखेडेंच्या घरावर सीबीआयचा छापा पडलाय. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात वानखेडेंनी शाहरुख खानकडूनं 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप होतोय. सीबीआयनं गुन्हाही दाखल केलाय. विशेष म्हणजे असेच आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी केले होते.

समीर वानखेडे यांनी शाहरुख खान याच्याकडून खरंच खंडणी घेतली? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 12:06 AM

मुंबई : ज्या अधिकाऱ्याला कधीकाळी मुंबईतल्या ड्रग्समाफियांचा कर्दनकाळ म्हटलं गेलं, त्याच समीर वानखेडेंवर ड्रग्स केसच्या नावानं सेलिब्रिटींकडून खंडणी उकळल्याचा आरोप झालाय. याच प्रकरणात सीबीआयनं मुंबईतल्या वानखेडेंच्या घरावर छापा टाकला, आणि भ्रष्टाचाराचा गुन्हाही दाखल करुन घेतलाय. विशेष गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी शाहरुख खानच्या मुलाची अटक फक्त खंडणी उकळण्यासाठीच झाल्याचा दावा केला होता. आता त्याच आरोपात सीबीआयनं वानखेडेंच्या घरावर छापा टाकलाय.

समीर वानखेडेंसह जी नावं मलिकांनी घेतली होती, जवळपास त्याच नावांच्या व्यक्तींवर सीबीआयनं भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. समीर वानखेडेंवर झालेल्या आरोपांवर भाजप नेत्यांची आता वेगळी भूमिका आहे. दीड वर्षांपूर्वी समीर वानखेडेंच्या कार्याचं भाजप नेते कौतूक करत होते. मात्र आता वानखेडेंवरच गंभीर आरोप झाल्यानंतर जो भ्रष्टच असेल त्यांच्यावर कारवाई होणारच अशी भाजपची भूमिका आहे.

वानखेडेंविरोधात नेमक्या कोणत्या आरोपांमुळे सीबीआयचा छापा?

ऑक्टोबर 2021 समीर वानखेडेंच्या नेतृत्वात एनसीबीनं मुंबईतल्या एका जहाजावर छापा टाकला. या छाप्यात ड्रग्स घेतल्याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत इतरांना अटक केली. कोर्टात मात्र आर्यन खान आणि इतरांची निर्दोष मुक्तता झाली. एनसीबी आणि समीर वानखेडे आर्यन खाननं ड्रग्स बाळगलं किंवा सेवन केल्याचा पुरावा देऊ शकले नाहीत.

कोर्टानं यावरुन समीर वानखेडेंच्या टीमवर ताशेरेही ओढले. यानंतर समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडून २५ कोटींची खंडणी मागितली होती, असा आरोप या केसमध्ये पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनीच केला. पुढच्या काही दिवसात पंच प्रभाकर साईल यांचा अचानक मृत्यू झाला. मृत्यूमागे हृदयविकाराचं कारण दिलं गेलं. नंतर समीर वानखेडेंच्या ड्रग्स छाप्यावरच्या कारवाईवरच प्रश्न उभे राहिले.

सीबीआयनं आता जी एफआयर दाखल केलीय, त्यात समीर वानखेडेंनी सामूहिकरित्या कट रचून शाहरुख खानकडे 25 कोटींची खंडणी वसुलीचं षडयंत्र रचल्याचं म्हटलंय. शिवाय या 25 कोटीपैकी 50 लाख रुपये वानखेडे आणि इतर आरोपीना मिळाल्याचाही दावा सीबीआयनं केलाय.

शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात झालेली अटक देशभर गाजली होती. मात्र नंतर हा छापा टाकताना ज्या-ज्या लोकांनी मदत केली, त्यांच्यावरही आरोप झाले. आर्यन खानला एनसीबी कार्यालयात पकडून आणणारा भाजपचा पदाधिकारी मनिष भानुशाली थेट गुजरातहून छापा टाकण्यासाठी एनसीबीच्या मदतीला आला होता.

ज्यानं छाप्यावेळी समीर वानखेडेंना मदत केली, तो के.पी.गोसावी याआधीच अनेक फसवणुकीच्या खटल्यांत महाराष्ट्र पोलिसांच्या नोंदीत फरार होता. फ्लेचर पटेल नावाचा व्यक्ती जो छाप्यावेळी पंच राहिला, तो याआधी सुद्दा समीर वानखेडेंच्याच तीन छाप्यांना पंच होता आणि आता मुळात जो छापा पडला, तो फक्त खंडणी उकळण्यासाठीच होता, या आरोपांत समीर वानखेडेंच्या घरावर छापा पडलाय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.