बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा, शर्ट बदलून पुन्हा घटनास्थळी आला होता शूटर
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी शिवकुमार गौतम याने या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. शिवकुमार पकडला गेल्यापासून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. गोळीबारानंतर त्याने कपडे बदलले आणि नंतर घटनास्थळी आल्याचे आरोपीने उघड केले..
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली. पण या प्रकरणात पोलिसांचा तपास अजून सुरु आहे. आतापर्यंत अनेक आरोपींना अटक केली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या हत्येमध्ये सहभागी असलेला शूटर शिवकुमारने अनेक मोठे खुलासे केले आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी कथित मुख्य शूटर शिवकुमार गौतम 12 ऑक्टोबर रोजी गुन्हा घडल्यानंतर 20 मिनिटे घटनास्थळी उपस्थित होता.
आता असा खुलासा झाला आहे की, या प्रकरणातील आरोपी गौतम कपडे बदलून घटनास्थळी परतला होता. “त्याने शर्ट, पिस्तूल आणि आधार कार्ड असलेली बॅग घटनास्थळी फेकून दिली होती,” असे अधिकाऱ्याने सांगितले. गोळीबारानंतर त्याने पाहिले की लोक घाबरले आहेत आणि मोठ्या संख्येने पोलीस तेथे आले आहेत आणि पोलीस गुन्हेगारांबद्दल सुगावा घेण्यासाठी जवळ उभ्या असलेल्या लोकांची चौकशी करत आहेत.
दोन साथीदार घटनास्थळावरूनच पकडले गेल्याचे त्याने पाहिले. इतकंच नाही तर बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी गौतम ऑटोरिक्षाने लीलावती हॉस्पिटलमध्ये देखील गेला होता आणि तो रात्री 10:47 वाजता कुर्ला रेल्वे स्थानकाकडे रवाना झाला. ट्रेनमध्ये चढल्यानंतर त्याने आपला मोबाईल फेकून दिला. पोलीस त्याचा शोध घेत होते. या प्रकरणात एकाला पंजाबमधील सीमावर्ती गावातून अटक करण्यात आली होती. पण त्याची या प्रकरणातील भूमिका उघड न झाल्याने त्याला सोडण्यात आले.
आरोपींच्या चौकशीदरम्यान, वॉन्टेड आरोपी शुभम लोणकर हा तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. शुभम लोणकर याने जुलैमध्ये छत्तीसगडच्या बिलासपूरपासून ५० किमी अंतरावर असलेल्या घनदाट जंगलात एके-४७ रायफल वापरण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे मुंबई गुन्हे शाखेला समजले. महाकाल येथे जात असताना शुभम लोणकर हे अटकेत असलेले आरोपी विलास आपुणे आणि रुपेश मोहोळ यांच्यासोबत उपस्थित होते. शुभम लोणकरला काही लोकांनी प्रशिक्षण दिले होते.
शुभम लोणकरने नक्षलवाद्यांकडून शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण घेतले होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. प्रशिक्षणाबाबत कोणालाही काही सांगू नका असे लोणकर याने अपुणे व मोहोळ यांना सांगितले होते. पुण्यातील एक नगरसेवक लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या ‘हिटलिस्ट’मध्ये असल्याची माहितीही पोलिसांनी मिळाली. बाबा सिद्दीकी हत्येच्या कटात अटक करण्यात आलेले आरोपी अनुराग कश्यप आणि ज्ञानप्रकाश त्रिपाठी यांनी भंगार विक्रेत्याला पैसे पाठवले होते. “हरीशने इतर अनेक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले होते आणि पैसे काढण्यासाठी शूटर्सना त्याचे एटीएम कार्ड दिले होते.