VIDEO : मुंबईत बाईकस्वाराने पोलिसाला उडवलं!
मुंबई : पोलिस कर्मचाऱ्याला बाईकस्वाराने उडवल्याची घटना मुंबईतील खारमध्ये घडली आहे. 15 दिवसांपूर्वी वांद्र्यातील कार्टर रोड परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यावेळी वेगात आलेल्या बाईकस्वाराने हेड कॉन्स्टेबलला उडवून फरफटत नेल्याची घटना घडली. हेड कॉन्स्टेबल सध्या गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरु आहे. नेमकी घटना काय घडली? मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोडवर खार पोलिसांनी नाकाबंदी […]
मुंबई : पोलिस कर्मचाऱ्याला बाईकस्वाराने उडवल्याची घटना मुंबईतील खारमध्ये घडली आहे. 15 दिवसांपूर्वी वांद्र्यातील कार्टर रोड परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यावेळी वेगात आलेल्या बाईकस्वाराने हेड कॉन्स्टेबलला उडवून फरफटत नेल्याची घटना घडली. हेड कॉन्स्टेबल सध्या गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरु आहे.
नेमकी घटना काय घडली?
मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोडवर खार पोलिसांनी नाकाबंदी केली होती. प्रत्येक वाहन तपासून पुढे सोडले जात होते. यावेळी पोलिस हेड कॉन्स्टेबल काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या सोबतीने तिथे उपस्थित होते. त्यावेळी एक बाईकस्वार वेगात आला, त्याला रोखण्यासाठी हेड कॉन्स्टेबल आडवे गेले. मात्र, बाईकस्वाराने बाईक थांबवलीच नाही आणि हेड कॉन्स्टेबलला फरफटत पुढे नेले.
या घटनेत हेड कॉन्स्टेबल जखमी झाला आहे, तर बाईकस्वारालाही दुखापत झाली आहे. हेड कॉन्स्टेबलवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
आरोपी बाईकस्वाराला अटक करण्यात आली असल्याची माहिती खार पोलिसांनी दिली आहे.
पाहा व्हिडीओ :