मुंबईची श्रीमंती काय वर्णावी.. एकट्या शहरात 1,596 अब्जाधीश, अल्ट्रा हाय नेटवर्थ असलेल्यांमध्ये भारत कोणत्या स्थानावर?

अहवालानुसार, 2026 पर्यंत मुंबईतील हे प्रमाण 29.6% पर्यंत वाढेल. पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये UHNWIs ची संख्या 1,119 एवढी होती. ती आता 42.6% नी वाढली असून 2021 मध्ये ती 1,596 पर्यंत पोहोचली आहे.

मुंबईची श्रीमंती काय वर्णावी.. एकट्या शहरात 1,596 अब्जाधीश, अल्ट्रा हाय नेटवर्थ असलेल्यांमध्ये भारत कोणत्या स्थानावर?
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 10:45 AM

मुंबईः टाटा-बिर्ला-अंबानी आणि श्रीमंत बॉलिवूड स्टार्सच्या वास्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील धनाढ्यांची (Mumbai billionaires) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता तर मुंबईतील अब्जाधीशांचा आकडा 1,596 एवढा गणला गेल्याने श्रीमंतांचं शहर अशी मुंबईची (Mumbai City) ख्याती अधिकच विस्तारणार आहे. जागतिक पातळीवरील नाइट फ्रँक्स नेटवर्थ रिपोर्ट (Knight Franks Net worth Report) 2022 चा अहवाल मंगळवारी जारी झाला. त्यात UHNWIs अर्थात अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स असलेल्यांमध्ये मुंबईने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. UHNWIs म्हणजे 225 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक संपत्ती आहे, असे व्यक्ती. जागतिक पातळीवर विचार केल्यास 2021 मध्ये भारतात अशा व्यक्तींची संख्या 11% नी वाढली आहे.

जगात आणि भारतात किती अब्जाधीश वाढले?

द वेल्थ रिपोर्ट 2022 नुसार, जगात UHNWIs ची संख्या 2021 मध्ये 9.3 टक्क्यांनी वाढली आहे. जगातील अब्जाधीशांची संक्या 6 लाख 10 हजार 569 एवढी झाली आहे. मागील वर्षी हा आकडा 5,58,828 एवढा होता. – भारतातील UHNWIs ची संख्या 2021 मध्ये 11 टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षी ही संख्या 12, 287 होती तर 2021 मध्ये भारतातील अब्जाधीशांची संख्या 13,637 एवढी झाली आहे. – भारतातील शहरांचा विचार करता बंगळुरूमध्ये धनाढ्यांची संख्या जास्त वाढली आहे. येथील संख्या 17.1 टक्क्यांनी वाढून 352 वर पोहोचली आहे. दिल्लीत 12.4 टक्क्यांची वाढ होऊन ती 210 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील धनाढ्यांची संख्या आधीच जास्त होती. ती 9 टक्क्यांनी वाढून ही संख्या 1,596 वर पोहोचली आहे.

‘मुंबईतील धनाढ्य वाढतच जाणार’

UHNWI अर्थात अब्जाधीश लोकांनी नेहमीच मुंबईत राहण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईतील धनाढ्यांची संख्या वाढतच आहे. एका अहवालानुसार, 2026 पर्यंत मुंबईतील हे प्रमाण 29.6% पर्यंत वाढेल. पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये UHNWIs ची संख्या 1,119 एवढी होती. ती आता 42.6% नी वाढली असून 2021 मध्ये ती 1,596 पर्यंत पोहोचली आहे.

श्रीमंतांची संख्या वाढण्याची कारणं काय?

नाइट फ्रँक इंडिया संस्थेचे एमडी शिशिर बैजल म्हणतात, इक्विटी मार्केट आणि भारतातील वेगाने वाढणारे डिजिटायझेशन यामुळे येथील अब्जाधीशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येत आहे. तरुण आणि स्वावलंबी अब्जाधीशांची संख्या जास्त आहे. नव्या संकल्पनांमध्ये आणि नूतनाविष्कारांमध्ये त्यांची गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे UHNWIs आणि अब्जाधीश लोकांमध्ये निकोप वृद्धी होत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल तसेच विविध क्षेत्रांमध्येही नव्या शक्ती उदयास येतील.

श्रीमंत शहरांतील जमीनीचे भाव काय?

नाइट फ्रँक वर्थ रिपोर्ट 2022 च्या अहवालानुसार, एक दशलक्ष डॉलर अर्थात 7.5 कोटी रुपयांमध्ये पुढील शहरांत किती जमीन येते, याचा अंदाज लावण्यात आला आहे. तो असा- मुंबई- 108.1 चौरस मीटर दिल्ली- 206.1 चौरस मीटर बंगळुरू- 357.3 चौरस मीटर मोनॅको (पश्चिम युरोपातील अब्जाधीशांचा देश)- 14.6 चौरस मीटर हाँग काँग (चीन)- 21.3 चौरस मीटर लंडन (ब्रिटन)- 36.6 चौरस मीटर

इतर बातम्या-

उधारीचे पैसे परत न दिल्याचा राग, नवी मुंबईत कामगाराकडून ठेकेदाराची निर्घृण हत्या

दारुच्या नशेत विनोद कांबळीची कारला धडक, कारमालकाशी वाद, माजी क्रिकेटपटूची दयनीय अवस्था | VIDEO Viral

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.