मंत्रिपदासाठी अमित शाह यांनी मागवले आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले, या अटी पूर्ण करणारे होणार मंत्री

Maharashtra Government Formation: एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना त्या व्यक्तीची कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. त्याची मंत्रिमंडळाच्या बैठकांची उपस्थिती पाहिली जाणार आहे. तसेच मंत्रिमंडळात असणाऱ्या आमदाराबाबत कोणताही वादविवाद नको आहे, अशा सूचनाही केंद्रीय नेतृत्वाने दिल्या आहे.

मंत्रिपदासाठी अमित शाह यांनी मागवले आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले, या अटी पूर्ण करणारे होणार मंत्री
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 11:42 AM

Maharashtra Government Formation: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींचा निकाल लागला आहे. त्यानंतर दहा दिवस होत आले तरी महायुतीचे सरकार अजून अस्तित्वात आले नाही. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी ठरला आहे. परंतु मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर झाले नाही. दुसरीकडे महायुतीमध्ये खाते वाटप आणि मंत्रीपदाची चर्चा सुरु आहे. कोणत्या पक्षाला कोणती खाती जाणार? तसेच मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार? याबाबत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीत चर्चा होत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मंत्रिपदासाठी निकष जाहीर केले आहे. या निकषांची पुर्तता करणाऱ्यांना मंत्रीपद मिळणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांच रिपोर्ट कार्ड मागवले आहे. संबंधित आमदाराचा लोकसभा निवडणुकीवेळी परफॉर्मन्स कसा होता, संबंधित व्यक्तीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच इमानेइतबारे काम केले होते का? हे पाहिले जाणार आहे.

मंत्रिमंडळात इच्छुक माजी मंत्री असेल तर संबंधित मंत्र्याने महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कामकाज कशा प्रकारे केले? संबंधित व्यक्ती मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होता. महायुती म्हणून आपल्या घटकपक्षातील आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती? केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे मंत्र्याने केला? संबंधित मंत्र्यामुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थितीत निर्माण झाली होती का? वादग्रस्त वक्तव्य केली का? या मुद्यांचे रिपोर्टकार्ड घेऊन महायुतीच्या नेत्यांना अमित शाह यांनी दिल्लीत बोलावले आहे. आज महायुतीचे नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

काय आहेत निकष

भाजपमधील मंत्रीपदाचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असणार आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु मंत्रिपदे देताना काय निकष असावे, त्यासंदर्भातील अटी केंद्रीय नेतृत्वाने दिल्या आहे. त्या मेरीटवर मंत्रीपदे बहाल केली जाणार आहे. त्यात त्या आमदाराची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी कशी होती? त्याच्या मतदार संघ आणि इतर जागांवर त्याने उमेदवार निवडून येण्यासाठी काय प्रयत्न केले ते पाहिले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

या अटींची पुर्तता करणाऱ्यास मंत्रीपद

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना त्या व्यक्तीची कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. त्याची मंत्रिमंडळाच्या बैठकांची उपस्थिती पाहिली जाणार आहे. तसेच मंत्रिमंडळात असणाऱ्या आमदाराबाबत कोणताही वादविवाद नको आहे, अशा सूचनाही केंद्रीय नेतृत्वाने दिल्या आहे. मंत्री असणाऱ्याने सर्वांना समावून घेण्याची जबाबदारी पार पाडावी तसेच पालकमंत्रीपद सांभाळण्याची क्षमता त्याच्यात हवी, असे केंद्रीय नेतृत्वाने म्हटले आहे. यावर मंत्रीपदाचे खाते वाटप जाहीर होणार आहे. मंत्रिमंडळात जास्तीत जास्त युवा आमदारांना संधी दिली जाणार आहे.

महाराष्ट्रातील महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणार आहे. त्यात तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेणार आहे. या समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे दहा ते बारा, राष्ट्रवादीचे आठ ते नऊ आणि भाजपकडून वीस जणांना मंत्री केले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.