लोकशाहीचे रक्षक असाल तर अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवा, सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
राज्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सभागृहात अनेक प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. त्यामुळे राज्याचं अधिवेशन एका आठवड्याने वाढवलं पाहिजे.
मुंबई: राज्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सभागृहात अनेक प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. त्यामुळे लोकशाहीचे रक्षक असाल तर राज्याचं अधिवेशन एका आठवड्याने वाढवलं पाहिजे, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. कमीत कमी एक आठवडा कालावधी वाढवला पाहिजे. कारण आमच्याकडे भरपूर कामकाज आहे. या सभागृहाला योग्य आणि समर्पक न्याय द्यायचा असेल तर एक आठवडा हे अधिवेशन वाढवलंच पाहिजे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. आज त्यांनी त्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आम्ही विरोधी पक्ष बसणार आहोत. त्यावर आमचा पुढील निर्णय घेणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर…
राज्याचं अर्थचक्र थांबलं आहे. अर्थचक्र कोमात गेलं आहे. आज राज्यात अनेक रोजंदारी कामगारांचे प्रश्न आहेत. धानाचा बोनस दिला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. कोरोनाच्या कालावधीत झालेला भ्रष्टाचार आहे. आरोग्य सेवेचं अपग्रेडेशन झालं नाही. मंत्रालया भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडत आहेत, असे अनेक विषय आहेत. पेपरफुटीसारखे घाणेरडे पाप या राज्यात होत आहे. त्यामुळे जनतेच्या मनात आक्रोश आणि रोष आहे. त्यामुळे हे लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील. नाही तर नाही वाढवणार, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
आधी उपाय योजना करा
नवीन निर्बंध लावण्याच्या आधी हाफकीन संस्था नवीन औषधे निर्माण करणार होती. आरोग्य भरती करण्यात येणार होती. या सर्व गोष्टींबाबत सरकार कुंभकर्णाच्या झोपेत असेल तर गैर आहे. निर्बंध लादलेच पाहिजेत. पण त्याआधी उपाययोजनाही केल्या पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
पेपरफुटीवर आम्ही प्रचंड आक्रमक होणार: चंद्रकांत पाटील
दरम्यान, विधिमंडळाचं अधिवेशन कमी वेळात उरकणं हे लोकशाहीला धरुन नाही. लोकशाहीची पायमल्ली करण्याचंच त्यांनी ठरवलं आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत काय निर्णय होतो ते पाहून आम्ही निर्णय घेऊ, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेणार आहोत. पेपर फुटीवर आम्ही प्रचंड आक्रमक होणार आहोत. सगळी क्रोनॉलॉजी, घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे. गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. सीबीआय चौकशी नको म्हणताय तर कुठली तरी चौकशी लावा, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
VIDEO : WinterSession | अधिवेशन कमी वेळात उरकरणं हे लोकशाहीचा धरुन नाही -चंद्रकांत पाटील @ChDadaPatil #WinterSession #ChandrakantPatil pic.twitter.com/t03tS6Zy5F
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 24, 2021
संबंधित बातम्या: