एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास भाजपचा नकार होता, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला निरोप पाठवला होतो, दिल्लीचा निर्णय काय येईल, हे आम्हाला माहीत नाही. परंतु आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाही. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुनंगटीवार यांच्यासह भाजच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी विरोध केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी रविवारी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती, असा दावा केला. त्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. २०१९ मध्ये आधी शिवसेना भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु होता. त्यावेळी शिवसेनेने विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केली. परंतु शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपचा विरोध होतो. शिंदे ज्युनिअर आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही, अशी भूमिका घेतली होती, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांचा दावा
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला निरोप पाठवला होतो, दिल्लीचा निर्णय काय येईल, हे आम्हाला माहीत नाही. परंतु आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाही. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुनंगटीवार यांच्यासह भाजच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी विरोध केला. शिंदे कोणालाच नको होते. शिंदे यांच्या कामाची पद्धत कोणाला नको होती. आम्हीतर एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचे नेते केले होते. त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले असते. परंतु भाजपने विरोध केल्यामुळे तो निर्णय झाला नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भाजपनंतर राष्ट्रवादीत विरोध
भाजपशी चर्चा अयशस्वी झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा सुरु झाली. त्यावेळी या दोन्ही पक्षांनाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नको, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, असे सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, अजित पवार यांनी म्हटले होते, असा दावा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला. एकनाथ शिंदे यांच्यासारखे लोक कुवत नसताना या ठिकाणी पोहचले आहेत.
मुंबईतील सहा जागांवर उद्या २० मे रोजी मतदान होत आहे. त्यापूर्वी संजय राऊत यांच्या दाव्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे नेते काय वक्तव्य करतात, याकडे लक्ष लागले आहे