Bjp First List Mumbai: मुंबईतील 36 मतदार संघापैकी कुठे, कुठे भाजपचे उमेदवार, मग शिवसेना-राष्ट्रवादीला कुठे मिळणार संधी?

Mumbai Assembly Constituency: भाजपने १४ ठिकाणी उमेदवार दिले असले तरी अजून काही ठिकाणी भाजपचे उमेदवार जाहीर होऊ शकतात. तसेच आदित्य ठाकरे यांचा वरळीमध्ये महायुती मनसे उमेदवारास पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

Bjp First List Mumbai: मुंबईतील 36 मतदार संघापैकी कुठे, कुठे भाजपचे उमेदवार, मग शिवसेना-राष्ट्रवादीला कुठे मिळणार संधी?
ajitdada, devendra fadnavis and eknath shinde
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 6:03 PM

Mumbai Assembly Constituency: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी यादी जाहीर करण्यात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. भाजपने राज्यातील ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात अनेक विद्यमान आमदार आहेत. मुंबईमधूनही अनेकांना पुन्हा संधी भाजपने दिली आहे. मुंबईमधील ३६ मतदार संघापैकी १४ मतदार संघात भाजपने उमेदवार जाहीर केले आहे. मागील पंचवार्षिकमध्ये म्हणजेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १९ जागा भाजपने लढवल्या होत्या.

भाजपने १४ ठिकाणी उमेदवार दिले असले तरी अजून काही ठिकाणी भाजपचे उमेदवार जाहीर होऊ शकतात. तसेच आदित्य ठाकरे यांचा वरळीमध्ये महायुती मनसे उमेदवारास पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी मनसेला महायुतीकडून पाठिंबा मिळू शकतो. त्यानंतर ३४ जागांवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. त्यापैकी सर्वाधिक जागा भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेला येणार आहे. तसेच अजित पवार यांच्या पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात अधिक जागा दिल्या जाणार आहेत.

या ठिकाणी भाजपचे उमेदवार

  1. दहिसर मनीषा अशोक चौधरी
  2. कांदिवली पूर्व अतुल भातखळकर
  3. चारकोप योगेश सागर
  4. मालाड विनोद शेलार
  5. गोरेगाव विद्या ठाकूर
  6. अंधेरी पश्चिम अमीत सातम
  7. मुलुंड मिहिर कोटेचा
  8. घाटकोपर पश्चिम राम कदम
  9. विले पार्ले पराग अलवणी
  10. वांद्रे पश्चिम आशीष शेलार
  11. मलबार हिल मंगलप्रभात लोढा
  12. कुलाबा राहुल सुरेश नार्वेकर
  13. सायन कोळीवाडा कॅप्टन आर तमिल सेल्वन
  14. वडाळा कालिदास निलकंठ कोलंबकर

या जागांवर महायुतीपैकी कोण असणार उमेदवार

  • धारावी
  • अणूशक्ती नगर
  • चेंबूर
  • मुंबादेवी
  • कलिना
  • वरळी
  • शिवडी
  • भायखळा
  • चांदिवली
  • कुर्ला
  • वांद्र पूर्व
  • घाटकोपर पूर्व
  • मानखुर्द शिवाजीनगर
  • विक्रोळी
  • भांडुप पश्चिम
  • अंधेरी पूर्व
  • बोरीवली
  • वर्सोवा
  • मागाठणे
  • जोगेश्वरी पूर्व
  • दिंडोशी
  • माहीम

पश्चिम महाराष्ट्रातील भाजप उमेदवार

  1. दौण्ड : ॲड राहुल कुल
  2. चिंचवड : शंकर जगताप
  3. भोसरी : महेश लांडगे
  4. शिवाजीनगर : सिद्धार्थ शिरोळे
  5. कोथरुड : चंद्रकांतदादा पाटील
  6. पर्वती : माधुरी मिसाळ
  7. सोलापूर उत्तर : विजयकुमार देशमुख
  8. अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी
  9. सोलापूर दक्षिण : सुभाष देशमुख
  10. मान : जयकुमार गोरे
  11. कराड दक्षिण : डॉ. अतुल भोसले
  12. सातारा : छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले
  13. कोल्हापूर दक्षिण : अमल महाडिक
  14. इचलकरंजी : राहुल आवाडे
  15. मीरज : सुरेश खाडे
  16. सांगली : सुधीर गाडगीळ
Non Stop LIVE Update
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी.
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले.
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी.
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?.
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?.
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे...
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे....
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश.
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर.
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्...
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्....
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट.