Bjp First List Maharashtra:भारतीय जनता पक्षाला हरियाणामध्ये सत्ता मिळाली. सर्व एग्झिट पोल फोल ठरवत भाजपने स्वबळावर सत्ता मिळावल्याचा धसका महाराष्ट्रातील आमदारांना घेतला होता. हरियाणा पॅटर्ननुसार महाराष्ट्रातही भाजप विद्यमान आमदारांना तिकीट कापणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे अनेक विद्यमान आमदारांऐवजी नव्या उमेदवारांना संधी दिली जाईल, तसेच जे तीन वेळा आमदार झाले आहेत, त्यांना संधी नाकारली जाईल, असेही म्हटले जात होते. परंतु भाजपने हरियाणा पॅटर्न न राबवता महाराष्ट्र पॅटर्न तयार केला. यामध्ये पुन्हा जुन्या आमदारांवरच विश्वास व्यक्त केला. केवळ दहा ठिकाणी नवीन उमेदवार दिले आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसला. पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्याची जबाबदारी आमदारांवर टाकली जाणार असल्याची चर्चा होती. तसेच राज्यातील सामाजिक आणि जातीय समीकरणे लक्षात घेऊन तिकीट वाटप करण्यात येईल, असे म्हटले जात होते. यामुळे भाजपच्या यादीत चमत्कार घडेल, अनेक जणांना धक्का बसले, असे म्हटले जात होते. परंतु भाजपकडून तसे काही झाले नाही. यामुळे विद्यामान आमदारांनी सुटकेचा निश्वास सोडला.
जळगाव शहरातून आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदार संघांमधून भाजपचे माजी मंत्री जयकुमार रावल यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. उत्तर सोलापूरमधून पुन्हा एकदा विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघातून भाजपचे आमदार प्रताप अडसड यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांना गोंदिया विधानसभेतून पुन्हा संधी दिली आहे. हिंगोली विधानसभेमधून तान्हाजी मुटकुळे यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे.
हे ही वाचा…
महाविकास आघाडीवर महायुतीची कुरघोडी, उमेदवार जाहीर करण्यात भाजप अव्वल, पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर